ताज्या घडामोडी

आठवण बळीराजाची- -पहिले “बळीराजा राष्ट्रीय संमेलन” तासगाव येथे दिनांक २६ व२७ जुन २०२२रोजी संपन्न

Spread the love

या संमेलनाचे अध्यक्ष मा.राजकुमार घोगरे

प्रतिनिधी – सौ.मंजुषा पवार.

या साहित्य संमेलना मध्ये शेतीच्या अनुषंगाने बळीराजा च्या पर्वापार चालत आलेल्या शेती साधना विषयी एक *छोटेसे प्रदर्शन *भरवले होते .या प्रदर्शनात,**माणदेशी रत्न*हा सन्मान मिळालेले काष्टशिल्पकार श्री.काशिनाथ राणोबा मोरे यांनी *लाकडी नांगराने नांगरणी करणारा शेतकरी व त्याची बैलजोडी*काष्टशिल्प रूपात साकारला होता .बळीराजाच्या या काष्टशिल्पाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले होते.*****,*******,**काष्टशिल्प ही कला सध्याच्या यांत्रिक युगात नामशेष होण्याच्या मार्गांवर आहे. शेतीच्या लाकडी औजारे दुरुस्त करणाय्रा सुतारावर उपासमारीची वेळ आली आहे.

परंतू आपल्या या कौशल्याला कलेच्या रुपात साकार करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली व त्यांनी हा छंद जोपासताना आपल्या घरगुती साधना व्दारे सुंदर सुंदर हत्ती, ऊंट ,बैलगाडी, टृक,बुध्दमूर्ती,विविध देवी देवता, बॅलन्स तराजू इ.काष्टशिल्पे बनवित आहेत .आगळा वेगळा छंद जोपासणारा हा अवलिया कलाकार मूळचा *अचकदाणी ता.सांगोला *येथिल असून सध्या “आटपाडी शहरात राहतो.आपल्या भारतीय संस्कृती मध्ये ऊंबराच्या लाकडाला खूप महत्व आहे.

हे लाकूड सरपणासाठी वापरले जात नाही किंवा शेतकरी ते विकतही नाहीत .अशा पडून राहिलेल्या लाकडापासून *देवी देवतांच्या सुंदर मूर्ती *साकारणारा हा कारागीर त्या लाकडांना न्याय देऊन त्यास पुजनीय बनवितो.मुळातच ही झाडे दुर्मिळ असल्याने मिळत नाहीत .आटपाडी सारख्या तालुक्याच्या ठिकाणी केवळ आपल्या कलेच्या जोरावर नावलौकिक मिळवून मानाने जगणाय्रा या माणदेशी रत्नाचा आदर्श तरुणांनी घ्यावा असा आहे. अशा या कलाकारास मानाचा मुजरा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!