राजकीय

सत्तेसाठी घोडेबाजार जनतेसाठी मात्र भूलथापांचा येडे बाजार ?

Spread the love

आत्ताच महाराष्ट्र राज्यमध्ये भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे शिवसेना गट यांचे सरकार स्थापन झाले मात्र सर्वच पक्षांचे राजकारण लक्षात घेतले तर, पैशाचा घोडेबाजार’सरकारी यंत्रणांचा गैरवापर सर्वसामान्य जनतेने विश्लेषण केले पाहिजे. आमदारांवर हजारो कोटी रुपये उधळले जातात कशासाठी सत्तेसाठी? आणि सत्तेच्या चाव्या देतात कोण सर्वसामान्य जनता जाती धर्माच्या नावाखाली राजकारण करून समाजामध्ये फूट पाडायची हे यांचे धंदे झाले आहे सत्तेसाठी अत्यंत खालच्या प्रकारचे राजकारण हे योग्य नाही आज लोकशाहीची संविधानाची मूळ धोक्यात येत आहे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे जणु यांचे गणितच झाले आहे ज्या शेतकऱ्यांचं राज्य या महाराष्ट्र मध्ये यायला पाहिजे ते तर येत नाही शेतकऱ्यांनी विचारपूर्वक मतदान न केल्याचे परिणाम शेतकरी आज भोगत आहे प्रत्येक वेळी शेतकऱ्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी हेच लढणार का? महाराष्ट्रमध्ये शेतकरी हिताचे जे निर्णय होतात ती निर्णय घ्यायला राजू शेट्टी हे सरकारला भाग पाडतात पण त्यांना साथ द्यायची कोणी हाही एक मोठा प्रश्नच आहे? सर्वसामान्य जनतेच्या पैशाचा प्रचंड प्रमाणात गैरवापर करून धनदांडगे पांढरा कपड्यातील राक्षस.पिढ्यानपिढ्या बसून खातील एवढे
कमून ठेवले आहे सर्वसामान्यांच्या पैशातून सत्ताधारी विरोधक यांना जनतेच्या प्रश्नाचे काही घेणे-देणे नसून फक्त सत्ता आणि सत्तेतून पैसा ही व्याख्याने आज अमलात आणली आहे

लेखक पत्रकार समाज प्रबोधनकार तसेच जय बाबा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अक्षय करपे हे आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!