ताज्या घडामोडी

१० वी,१२ वी हा विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या आयुष्यात मोलाचा टप्पा -प्रतिकदादा पाटील

Spread the love

इस्लामपूर दि.४ प्रतिनिधी
१० वी,१२ वी हा विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या आयुष्यात मोलाचा टप्पा आहे. आपण योग्य मार्गदर्शन घ्या,आपली आवड-निवड,बौध्दिक क्षमतेप्रमाणे योग्य क्षेत्राची निवड करा. आम्ही कायम तुमच्या पाठीशी आहोत,असा विश्वास युवा नेते प्रतिकदादा पाटील यांनी इस्लामपूर, कासेगाव व आष्टा येथील १० वी,१२ वीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या मार्गदर्शन शिबिरात बोलताना व्यक्त केला.
इस्लामपूर येथील राजारामबापू नाट्यगृहा त राष्ट्रवादी पदवीधर संघ,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस,राजारामबापू पॅरामाउंट ॲकॅडमी व जयंत करिअर गाईडन्स सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता १० वी,१२ वीचे विद्यार्थी व पालकांसाठी आयोजित करिअर मार्गदर्शन मेळावा व गुणवंतांचा सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. राजारामबापू ज्ञान प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा.शामराव पाटील,कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव आर.डी.सावंत प्रामुख्याने उपस्थित होते.
प्राचार्य आर.डी.सावंत म्हणाले,तुम्ही क्षेत्र कोणतेही निवडा,तुम्हाला कष्ट जिद्द व चिकाटीशिवाय यश मिळू शकत नाही,याचे कायम भान ठेवा. आम्ही तुमच्या शैक्षणिक वळणावर तुम्हाला मार्गदर्शन करायला सदैव तयार आहोत. आपण याचा पुरेपूर लाभ घ्यावा.
या शिबिरात दिशा पाटील,राजशेखर यांनी जेईई,नीट या विषयावर,संचित तिपायले यांनी एनडीए या विषयावर,हर्षल पाटील यांनी स्टार्टअप इंडिया या विषयावर,चंद्रकांत निकोडे यांनी करियर निवड या विषयावर, सागर वाटेगांवकर यांनी आयटीआय कोर्सेस या विषयावर,एस.पी.यादव यांनी मानसशास्त्रीय कसोट्या या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले आहे.
यावेळी अँड.चिमण डांगे,विजयराव पाटील,बाळासाहेब पाटील,संजय पाटील, शहाजी पाटील,खंडेराव जाधव,संदीप पाटील, आयुब हवलदार,संग्राम जाधव, देवराज देशमुख,सचिन कोळी यांच्यासह १० वी,१२ वीचे विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
प्रारंभी पदवीधरचे राज्य सरचिटणीस विशाल सुर्यवंशी यांनी स्वागत प्रास्ताविक केले. विद्यार्थी सेलचे इस्लामपूर उपाध्यक्ष राज पाटील यांनी आभार मानले. प्रा.साळवे, ऋतुजा पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
विशाल सुर्यवंशी,प्रवीण डबाणे,महेश पाटील,राज केदार आटूगडे,अविनाश जकाते, कुणाल काळोखे,सुशांत कुराडे,प्रतिक नायकल,अमन मुल्ला,विनायक बेडके, हर्षवर्धन पाटील,गिरीश शेटे,अरबाज मुलाणी, पंकज कोरे,किरण नाथगोसावी,प्रविण पाटील,लखन पवार यांच्यासह युवक कार्यकर्त्यांनी तिन्ही गावातील मार्गदर्शन शिबिरांचे नियोजन केले.

कासेगाव,आष्टा येथेही मार्गदर्शन शिबिरे
कासेगाव येथील लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या पदयात्री स्मारक व आष्टा येथील आर्टस् अँड कॉमर्स कॉलेजमध्येही ‘करिअरच्या वाटा’या विषयावर १०वी,१२ वी च्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यात आले. कासेगाव येथे चंद्रकांत निकोडे,तर आष्टा येथे प्राचार्य राजेंद्र कुरळपकर यांनी मुख्य मार्गदर्शन केले. देवराज पाटील,सरपंच किरण पाटील,सचिन पाटील,विराज शिंदे,संग्राम फडतरे,माणिक शेळके,शिवाजी चोरमुले यांच्यासह मान्यवर व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.इस्लामपूर येथे करिअरच्या वाटा व गुणवंतांच्या गौरव समारंभात गुणवंत विद्यार्थी- विद्यार्थिनींच्या गौरव करताना प्रतिकदादा पाटील. समवेत आर.डी.सावंत, विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, विशाल पाटील,संग्राम जाधव,देवराज देशमुख व मान्यवर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!