ताज्या घडामोडी

मुख्याध्यापिका सौ. कल्पना जोशी यांचा निरोप व सत्कार समारंभ संपन्न.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी /
दि.2 जुलै,2022 रोजी कन्या शाळा शिराळाच्या मुख्याध्यापिका माननीय सौ.कल्पना सुनिल जोशी यांचा कृतज्ञतापूर्वक निरोप व सत्कार समारंभ साजरा करण्यात आला.
दि. 30 जून रोजी 34 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्या निवृत्त झाल्या. त्याबद्दल संस्थेचे चेअरमन माननीय श्री. आर. व्ही.हसबनीस सर यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार मूर्ती सौ. कल्पना जोशी मॅडम यांच्याविषयी कन्या शाळेच्या सहअध्यापिका सौ.साळुंखे मॅडम यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे चेअरमन मा. श्री. आर. व्ही. हसबनीस सर यांनी तसेच संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. वैजनाथ महाजन सर यांनी यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून सर्वांना मार्गदर्शन केले व सत्कारमूर्ती जोशी मॅडम यांना शुभेच्छा दिल्या. सत्कारमूर्ती सौ. जोशी मॅडम यांनी आपल्या सेवेतील अनुभव मनोगतामधूनव्यक्त केले. या कार्यक्रमाचे आभार अध्यापिका सौ.पाटील मॅडम यांनी मानले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.महाजन मॅडम यांनी केले.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री. वैजनाथ महाजन सर, संस्थेचे चेअरमन मा. श्री. आर. व्ही. हसबनीस सर, सह कार्यवाह मा. श्री. नवांगूळ सर,संस्थेचे ज्येष्ठ संचालक मा.श्री.पवारसर,मा.श्री.बुकशेटे सर, मा.श्री. प्रदीप हसबनीस सर, मा.सौ. हसबनीस मॅडम, पंचायत समिती शिक्षण विभागाचे गटशिक्षणाधिकारी मा. श्री. कुडाळकर साहेब, विस्तार अधिकारी मा. श्री. दळवी साहेब, केंद्र प्रमुख मा. श्री. रोकडे साहेब,कन्याशाळा शिराळाच्या मुख्याध्यापिका मा.सौ.सुनंदा चौगुले मॅडम,पर्यवेक्षिका मा. सौ.देशपांडे मॅडम सर्व शिक्षक -शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी संस्थेच्या सर्व शाळांचे आजी-माजी मुख्याध्यापक,शिक्षक प्रतिनिधी शिक्षकेतर कर्मचारी, सौ.जोशी मॅडम यांचे आप्तेष्ट व स्नेही उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!