ताज्या घडामोडी

महाराष्ट्रात वक्ते घडविणारे विद्यापीठ प्रा. शिवराज आनंदकर सर – प्रफुल्लजी प्र. खपके

Spread the love

महाविद्यालयीन काळात वकृत्व स्पर्धेच्या पारितोषिकेतून बहिणीची डिलिव्हरी साठी पैसे जमविणारा विद्यार्थी आज राज्यातील वक्त्यांच्या गळ्यातील ताईत.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रा. प्राचार्य शिवराज आनंदकर सर..
स्वातंत्र्याच्या सात दशकानंतरही ज्या गावात महामंडळाची बस पोहोचली नाही अशा खेडेगावातून येणारा एक तरुण आपल्या स्वप्नांच्या आणि जिद्दीच्या बळावर राज्यातील वकृत्व क्षेत्रात फार मोठे परिवर्तन करतो. आणि महाराष्ट्र वकृत्व परिषद नावाची राज्यव्यापी संघटना जन्म घेते.
आपल्या महाविद्यालयीन जीवनात वकृत्वाचा ध्यास अंगी बाळगून ह्या गावातून त्या गावात, या शहरातून त्या शहरात सातत्याने प्रवास करत वकृत्वाचे हर एक व्यासपीठ गाजवले पण यशाची धारा गळी पडत नव्हती. तब्बल ७८ वकृत्व स्पर्धा संपूर्ण राज्यात हरल्यानंतर ७९ वी आयुष्यातली पहिली वकृत्व स्पर्धा सोनई महाविद्यालयाची जिंकली आणि तिथून जो संघर्षमय प्रवास सुरू झाला. तो महाविद्यालयीन जीवन संपेपर्यंत राज्यातील सर्वाधिक ७९८ वकृत्व स्पर्धा जिंकल्या. हा विक्रम करणारा राज्यातला एकमेव वक्ता ठरणारा हा विद्यार्थी म्हणजेच प्राध्यापक शिवराज आनंदकर सर.
आज पूर्ण राज्यात खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र वकृत्व परिषदेच्या माध्यमातून वक्ते उभे करण्याचं त्यांना व्यासपीठ प्राप्त करून देण्याचं व त्यांच्या हाताला रोजगार देण्याचे देवी काम प्रा. शिवराज आनंदकर सर यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्र वकृत्व परिषदेच्या माध्यमातून आम्ही सर्वजण करत आहोत.
आज वकृत्व क्षेत्राकडे तरुणांचा वाढता ओघ व त्यांना मिळणाऱ्या रोजगाराच्या संधी हे गेल्या एका दशकात प्रा. शिवराज आनंदकर सरांनी रात्रंदिवस एक केल्याचे फळ आहे.
या राज्यातील गोरगरीब विद्यार्थ्यालाही वकृत्वाचा माईक व व्यासपीठ आपलेसे वाटावे यासाठी अनेक व्यासपीठे वकृत्वाच्या संधी उभ्या करून माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातल्या अनेक वक्त्यांना घडवण्याचं काम सर आपणच केले आहे.
निस्वार्थी भावनेने स्वतःला एखाद्या क्षेत्रात झोकून देने काय असते हे मी आपल्या सोबत कोल्हापूरच्या प्रवासात असताना बघितले आहे. दोन दिवस सातत्यपूर्ण कामाच्या व्यापात असतानाही त्यादिवशी रात्री दोन वाजता आपल्या चेहऱ्यावरती प्रचंड झोप होती. पण साताऱ्यामध्ये असताना आपण गाडीतून खाली उतरलात आणि एक गार पाण्याची बिसलरी बाटली अक्षरशा झोप जावी म्हणून तोंडावरती ओतून घेतली. आणि पुढचा प्रवास सुरू ठेवला. आणि सकाळी नऊ वाजता पोहोचून आपण मीटिंग केलीत. सर आपला हा त्याग, आपल्यातली ही ऊर्जा, आपल्यातला हा गंध आम्हा वकृत्व क्षेत्रातल्या प्रत्येक तरुणाच्या नसानसात उतरला तर आपण करीत असलेल्या धडपडीची निश्चितच क्रांती होऊन याचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही ही मला खात्री आहे.
आपण नेहमी म्हणता लढण्याची ऊर्जा जर तरुणांमध्ये निर्माण करायची असेल तर तरुणांनी वकृत्वाच्या व्यासपीठावरती उभं राहिला शिकावं. कारण वकृत्व स्पर्धांच्या माध्यमातूनच राज्यभर फिरत असताना हर एक व्यासपीठावर बोलून यश-अपयश पचवण्याची फार मोठी ताकद वकृत्वच आपल्याला देते. आणि याची प्रचिती आपल्या कर्तृत्वातून होते आहे.
बोलण्यापेक्षा कृतीवर भर देणं आपण आम्हाला शिकवलं.
चालण्यासाठी वाट असते वाटेसाठी चालायचं नसतं हे आपलं वाक्य आम्हाला उंच भरारी घेणाऱ्याला आकाशाचे भान नसतं या वाक्याची प्रचिती करून देते.
संकटावर कसं तुटून पडायचं हे आपल्याकडून शिकावं, धरलं की सोडायचं नाही हा सरांचा विचार वकृत्व क्षेत्रातील तरुणांच्या भविष्यात अमुलाग्र बदल घडून आणणार आहे असं मला वाटतं.
एक हजारांमध्ये एखादा वक्ता घडतो पण त्या घडत असलेल्या वक्त्याला घडवण्यासाठी संघर्ष काळात प्रा. शिवराज आनंदकर सर तत्परतेने उभे राहतात म्हणून आज राज्यात शेकडो वक्ते टाइट मानेने आप-आपल्या क्षेत्रात उभे दिसतात.
संघटन श्रेणीमध्ये सरांचे व्यक्तिमत्व अद्वितीय आहे. याचे कारण वकृत्वावरती निस्वार्थ असलेलं प्रेम असावं असं मला वाटतं कारण राज्यातला कुठलाही वक्त आर्थिक अडचणीत असताना पहिली पाच-दहा हजाराची मदत ज्यांच्याकडून जाते ते नाव म्हणजे प्रा. शिवराज आनंदकर सर सुखाचं माहित नाही. पण वक्त्यांच्या दुःखात खांद्याला खांदा लावून उभे राहणारे व्यक्तिमत्व प्रा. शिवराज आनंदकर सर
इतिहास विसरणाऱ्यांचा भविष्यकाळ नसतो. म्हणून इतिहास काळजात ठेवून वर्तमानात जगाव. तेव्हा भविष्याच्या वाटा कर्तुत्वाने गजबजलेल्या दिसतील. आपले हे वाक्य आम्हा सर्व वक्त्याच्या ध्येय यात्रेचं शीर्ष बिंदू ठरावं हीच आपल्या वाढदिवसानिमित्त आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!