ताज्या घडामोडी

प्रा.खानोलकर यांच्या निवेदनाचे अभिनेते दिंगबर नाईक याच्याकडूनही कौतुक

Spread the love

खानोली गावचे सुपुत्र प्रा.वैभव खानोलकर यांनी आपल्या अभ्यासपुर्ण सुत्रसंचालनातुन गुरुपौर्णिमेचे औचित्य साधुन संपन्न झालेल्या शिर्डी येथील वैचारिक संमेलन व गुणगौरव कार्यक्रमात शिर्डिवासियां सह महाराष्ट्रातील अनेक श्रोत्यांची मने जिंकत सिंधुदुर्गाची शान वाढवली.
शिर्डीत साई वात्सल्य संस्थेच्या वर्धापन दिना निमित्ताने साई संस्थानाच्या प्रशस्त नाट्यगृहात संपन्न झालेल्या कार्यक्रमात सिने अभिनेता दिंगबर नाईक हे ही प्रा.वैभव खानोलकर यांच्या अभ्यासपुर्ण निवेदनाने भारावुन गेले व आपल्या मार्गदर्शनपर मनोगतात प्रा.वैभव खानोलकर यांच्या सुत्रसंचालनाचे कौतुक करत.
शाल,श्रीफळ,भेटवस्तु देऊन विशेष सत्कार हि नाईक याच्या शुभहस्ते करण्यात आला.प्रा.खानोलकर हे नेमळे पंचक्रोशी विद्यालय नेमळे,सावंतवाडी आणि न्यू इग्लिश स्कूल उभादांडा वेंगुर्ला या दोन्ही प्रशालेत अध्यापनाचे कार्य करतात.
दशावताराचे युवा अभ्यासक, दशावतार कलावंताच्या मुलाखती,युवाव्याख्याते, विविध विषयावर मुक्तपणे लेखन आणि सुप्रसिद्ध निवेदक म्हणुन ते परिचित आहे.
आपल्या अभ्यासपूर्ण निवेदनातुन त्यांनी या पुर्वी डाँ.प्रकाश आमटे,पद्मश्री सिधुताई सपकाळ, सिनेतारका वर्षा उसगावकर निवेदिका समिरा गुजर, आमदार निलेश राणे, माजी मुंख्यमत्री नारायणराव राणे,गोव्याचे कामगार नेते अँड.राणे,खासदार संजय राऊत,अभिनेता माधव अभ्यंकर,अरुण नलावडे,
गोव्याचे सांस्कृतिक मंत्री गोंविद तावडे,विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे समाजसेविका तृप्ती देसाई सह अँड प्रकाश आंबेडकर,अभिनेत्री किशोरी आंबिये यांची प्रमुख उपस्थिती असलेल्या कार्यक्रमाचे अभ्यासपुर्ण निवेदन करताना याच्या ही मनाचा वेध घेत शाबसकी मिळवली.
आपल्या अभ्यासपुर्ण निवेदनातुन राज्यस्तरावर सिंधुदुर्गाचे नाव झळकवणा-या “द व्हाईस आँफ सिधुदुर्ग म्हणुन आपली ओळख निवेदनाच्या क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणा-या प्रा.खानोलकर” यांच्यावर त्याच्या अभ्यासपुर्ण निवेदनाचे राज्यस्तरातुन कौतुक केले जात आहे.
आपल्याला मिळालेले यश हे केवळ आपले नसुन माझ्या खानोली गावासह ,दोन्ही संस्थेचे संस्था चालक,वइतर संस्था पदाधिकारी,मुख्याध्यापक,प्राचार्या सह माझे शिक्षक सहकारी ,मला या निवेदनाच्या क्षेत्रात मार्गदर्शन करणारे सर्वच सिधुदुर्गवासी यांचे हे यश आहे अशा भावना प्रा.वैभव खानोलकर यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!