आरोग्य व शिक्षणकृषीवार्ताताज्या घडामोडी

मावळातील नायगाव येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये दिंडी सोहळा उत्साहात साजरा ll

Spread the love

मावळातील नायगाव येथे जिल्हा परिषद शाळेमध्ये दिंडी सोहळा उत्साहात साजरा ll

आवाज न्यूज: कोरोनाच्या काळामध्ये दोन वर्षे दिंडीला परवानगी मिळाली नव्हती आता गावोगावी तसेच अनेक ठिकाणाहून वारकरी भक्ती भावाने वारीला जाताना दिसत असताना लहान मुलांनी तरी का मागे रहावे यासाठी नायगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांची आज दिंडी काढण्यात आली .
पालखी ही विद्यार्थ्यांनी शाळेतच शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयार केली होती .

त्यावेळेस पहिली ते सातवीच्या लहान मुलांनी वारकऱ्यांच्या पारंपारिक वेशांमध्ये येऊन दिंडी काढली होती.
इयत्ता पहिलीच्या सात्विक सोमनाथ शिंदे या विद्यार्थ्याने विठुरायाचे सावळे रूप घेऊन तर शिवन्या नारायण वावरे या विद्यार्थीनीने रुक्मिणीचे सुंदर साजिरे रूप व आकर्षक वेशभूषा घेऊन कार्यक्रमाची व दिंडीची शोभा आणखी खुलवली होती.

जिल्हा परिषद शाळेतून निघालेली ही दिंडी नायगाव येथील नागनाथाच्या मंदिरामध्ये थोड्यावेळ विसावली, त्यानंतर मुख्याध्यापिका माया कुटे मॅडम यांनी आपल्या सुंदर अभंग गायनाने सर्व विद्यार्थी तसेच पालक वर्ग व शिक्षकांना मोहित करून मुलांना देखील अभंग म्हणायला लावले व त्यानंतर विद्यार्थ्यांनी भजन व दिंडीचे गीते सादर केली.
शिक्षिका लोंढे मॅडम ,शिक्षिका जगताप मॅडम ,मुंढे मॅडम यांनी महाराष्ट्रातील दिंडीची परंपरा नक्की कशी आहे याविषयी अधिक माहिती विद्यार्थ्यांना दिली.
त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून दिंडीची सांगता करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!