आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

mavaltaluka.com या पंचायत समितीच्या वेबसाईटचे अनावरण…..

वेबसाईटवर पंचायत समितीचे विविध विभाग, अधिकारी, शासकीय योजना, पर्यटन स्थळे आदि.माहिती उपलब्ध...

Spread the love

mavaltaluka.com या पंचायत समितीच्या वेबसाईटचे अनावरण…..

आवाज न्यूज:मावळ पंचायत समिती सभागृहात, आमदार सुनील शेळके यांची आढावा बैठक,आज संपन्न झाली.यावेळी mavaltaluka.com या पंचायत समितीच्या वेबसाईटचे अनावरण करण्यात आले.या वेबसाईटवर पंचायत समितीचे विविध विभाग, अधिकारी, शासकीय योजना, पर्यटन स्थळे आदि.माहिती देण्यात आली आहे.
आज झालेल्या बैठकीत कृषी,आरोग्य,शिक्षण, बांधकाम इ.विभागातील कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

• जुन महिन्यात पावसाने दडी मारल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते.परंतु मागील काही दिवसांपासून पावसास सुरुवात झाली असल्यामुळे भातलागवडीसह शेतीच्या इतर कामांनाही वेग आला असुन खते, बी-बियाणे यांचा तुटवडा पडणार नाही याची काळजी घ्या. शेतकऱ्यांसाठी सर्व कृषी सेवा केंद्रांवर खते उपलब्ध होतील,याचे नियोजन करावे.

• पंचायत समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभाच्या योजना व लाभार्थ्यांच्या आकडेवारीची माहिती घेतली.तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातून सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली.ग्रामीण भागातील महिला बचत गटांकडून बनविण्यात येणाऱ्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध झाली पाहिजे.या उद्देशाने विक्री केंद्रासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.

•जि.प.शाळा,अंगणवाडी याठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध कराव्यात.शिक्षण विभागाने विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत.विद्यार्थ्यांचे गणवेश,पोषण आहार याबाबत सविस्तर माहिती घेतली. शाळा दुरुस्ती साठीचे प्रस्ताव तयार करून सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
• आवश्यकता असलेल्या ठिकाणी रस्ते दुरुस्तीची कामे करावीत.
• ‘जल जीवन मिशन’ अंतर्गत तालुक्यात सुरू असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला.सर्व योजनांची कामे पूर्णत्वास नेण्यासाठी अधिकारी, ठेकेदार यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे.15 ऑगस्ट पर्यंत सर्व योजना पुर्ण करण्यावर भर द्यावा.
बैठकीत झालेल्या चर्चेनुसार सर्व कामे जबाबदारीने पूर्ण करावीत, अशा सुचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

या बैठकीस, गटविकास अधिकारी सुधीर भागवत, सहाय्यक गटविकास अधिकारी प्रताप पाटील, कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ, तसेच सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!