ताज्या घडामोडी

कवी रमेश पवार लिखित कविता संग्रह “गावगाड्याच्या पडझडीचे संदर्भ”चे प्रकाशन

Spread the love

ईगल न्युज अमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील 
_ ज्येष्ठ गीतकार बाबासाहेब सौदागर. यांचे हस्ते संपन्न

अमळनेर आपल्या माय मातीचा,कुटुंबाचा सर्वाथाने आधार म्हणजेच गावगाडा होय, नाती जोपासत मोठी झालेली पिढी आपल्या शेतीला,मातीला आणि बापाला देखील विसरत नाही ही उजेडवाट दाखवणारी कविता ,मांडणी कवी रमेश पवार यांच्या कवितासंग्रहात येते असे विचार सुप्रसिध्द गीतकार बाबासाहेब सौदागर यांनी कवी रमेश पवार लिखित गावगाड्याच्या पडझडीचे संदर्भ ह्या कवितासंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी छ.शिवाजी महाराज नाट्यगृह येथे व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.मिलिंद बागुल होते ते म्हणाले बापाचं जगणं आणि गावाचं वाढण ह्या सोप्या गोष्टी नाहीत बापाच्या जगण्याची,त्याच्या कष्टाची, श्रमाची फलश्रुती लेकराची समृध्द जीवनवाट असते त्या जीवन वाटेची वास्तवता कवी रमेश पवार यांनी प्रामाणिकपणे जगाचं प्रतिनिधित्व करणारा बाप गावगाड्याच्या पडझडीचे संदर्भ ह्या कविता संग्रहातून मांडले असल्याचे मत मांडले. कवी लेखक रमेश पवार यांनी आपल्या कवितांतून माझ्या गावगाड्यान मला घडवत बापानं जी ऊब दिली त्यातून मिळालेली ऊर्जा मला साहित्याकडे नेणारी ठरल्याचे मत मांडत अनुभव कथन केले. माझ्या मित्र परिवाराने एकत्र येऊन मदत करून माझ्या कविता संग्रहाचे प्रकाशनाचा सोहळा ठेवला,हा माझ्या आयुष्यातला परमोच्च आनंदाचा क्षण आहे असे उद्गार त्यांनी काढलेत अखेर ते भावनिक होऊन त्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झालेत. प्रमुख अतिथी प्रा.बी. एन.चौधरी यांनी कवितासंग्रहात असणाऱ्या बापाच्या वेदना, पुढच्या पिढीतील युवकांना कश्या जाणवतील हा जरी प्रश्न असला तरी हा कवितासंग्रह या प्रश्नाला उत्तर असल्याचे मत त्यांनी मांडले. अथर्व पब्लिकेशनचे युवराज माळी,कवी रमेश पवार, चित्रकार राजू बाविस्कर,प्रदीप पवार, डॉ. अविनाश जोशी, सौ.प्रमिला पवार,काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रदिप पवार,खान्देश शिक्षण मंडळाचे संचालक डॉ.अनिल शिंदे आदि विचार मंचावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप घोरपडे यांनी तर, सूत्रसंचलन सामाजिक कार्यकर्ते रणजित शिंदे, प्रा.डॉ.नयना नवसारिकर यांनी केले. आभार सानेगुरुजी ग्रंथालय अध्यक्ष दिलीप सोनवणे यांनी मानले.याप्रसंगी युवराज माळी,प्रदीप पवार, सुदाम महाजन, अविनाश जोशी, यांनी मनोगत व्यक्त केले.सानेगुरुजी कन्या विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी शेतकरी जीवनावर लक्षवेधी नाटिका सादर केली.
यावेळी मारवड शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव पाटील ,राष्ट्रवादी साहित्य व सांस्कृतिक सेल चे राज्यसचिव गिरीष पाटील, जेष्ठ नागरिक मंडळाचे सचिव शिवाजी मोहन पाटील, धनगर पाटील, प्रा.अशोक पवार,राजेंद्र पारे,भाऊसाहेब भदाणे, प्रा.कुणाल पवार,रविकांत पवार,सुधाकर पवार,युवराज पवार, गो.शी.म्हसकर, कमलबाई पवार यांचेसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.रमेश माने,बन्सीलाल भागवत , भाऊसाहेब देशमुख, प्रा.लिलाधर पाटील,शरद पवार, मयुर पवार,अविनाश पवार,मृणाल पवार
आदिंसह रमेश पवार मित्र मंडळाने परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!