ताज्या घडामोडी

मराठा समाजात धडधाकट मुलांना झुगारून, अपंग मनिषाने केला अपंग विजयशी विवाह!!

Spread the love

ईगल न्यूजअमळनेर प्रतिनिधी एस एम पाटील 

अमळनेर येथील मराठा मंगल कार्यालयात आज दोन्ही पायांनी अपंग असणाऱ्या वधू वराचा आदर्श विवाह पार पाडून समाजात एक नवीन आदर्श निर्माण करून दिला आहे.मराठा समाजात उपवर मुलामुलींचे लग्न जमविण्यासाठी वर वधू पित्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागते.परंतु लग्नाचा गाठी वरूनच बांधून येत असल्याचा प्रत्यय आज मराठा मंगल कार्यालयात पार पडल्यानंतर अनुभावस आला.विजय लोटन पाटील रा.वासरे ता.अमळनेर हा दोन्ही पायांनी अपंग असून त्याला आधाराशिवाय चालता येत नाही.तरी देखील पाडसे ग्रामपंचायत कार्यालयात संगणक परिचालक म्हणून कुटुंबाचा उदरनिर्वाह साठी हातभार लावत होता.दोन्ही पायांनी अपंग असल्याने त्याचे लग्न कसे होईल ह्या विवंचनेत कुटूंब पडले होते.मात्र चाळीसगाव तालुक्यातील वडाळा वडाळी येथील मनीषा चुडामन आमले ही नववधू ही दोन्ही पायांनी अपंग होती.तिलाही आधाराशिवाय चालता येत नव्हते.ती सुद्धा चाळीसगाव येथे किराणा दुकान चालवून कुटूंबाला हातभार लावत होती.दोघांचेही योग जुळून आल्याने त्याचा आदर्श विवाह आज मराठा मंगल कार्यालयात पार पडला.
तसे पाहिले तर समाजात आज मुलांच्या लग्नाचा विवाह जुळण्याचे प्रमाण कमी होत चालले असून त्यामुळे विवाहाचा गुंता वाढताना दिसत आहे अनेक तरुणांनी चाळीशी गाठली आहे परंतु सध्याच्या काळात अजूनही असंख्य तरुण विवाहाच्या प्रतीक्षेत आहे परंतु या दोन्ही अपंगाचे दोनाचे चार हात झाल्याने दोन्ही कुटुंब आनंदात असून शहरात एक आदर्श विवाह झाल्याने सर्वजण याचेच कौतुक करीत आहेत. दोन्ही अपंग दांपत्याचा विवाह जोडण्यासाठी मुलीचे मामा सेवा निवृत्त मंडळ अधिकारी एस एम पाटील,मुलाचे भाऊ ज्ञानेश्वर लोटन पाटील व मुलीचे मेव्हणे श्याम देसले यांनी संयोजकाची भूमिका पार पडली.या लग्न सोहळ्यास मराठा सेवा संघ चे अध्यक्ष जयंवतराव पाटील, संचालक तथा ईगल न्युज प्रतिनिधी शिवाजी मोहन पाटील,विक्रांत पाटील,गजानन परिवाराचे विठ्ठल पाटील,माध्यमिक विद्यालय मंगरूळ ता.पारोळा चे चेअरमन अशोक मोहन पाटील,एस डी सोनवणे, आर व्ही पाटील,सुभाष साळुंखे,योगेश बाग जे बी पाटील एम आर पाटील मनिष सनेर,संदीप पाटील,अपंग मित्रमंडळ आदीसह समाज बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!