ताज्या घडामोडी

महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या राज्याध्यक्षपदी डॉ.संग्राम शिंदे यांची निवड

Spread the love

राधानगरी तालुक्यामधील येळवडे उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.संग्राम शिंदे यांची महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या राज्याध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेची कार्यकारिणी ही 2021 ते 2023 अशी दोन वर्षांसाठी करण्यात आली होती.2021-22 या वर्षासाठी डॉ.अमोल रावते यांची राज्याध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.डॉ.रावते यांनी आपल्या कार्यकालामधे संघटना बांधणीसाठी विशेष प्रयत्न केले.आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना भेटून समुदाय आरोग्य अधिकार्यांचे प्रश्न मांडले.तसेच विविध राजकीय नेत्यांना भेटून समुदाय आरोग्य अधिकार्यांचं आरोग्य क्षेत्रातील महत्त्वं आणि कार्याची माहिती दिली.त्यांच्या हितासंदर्भात निर्णय घेतले.
2022-23 या वर्षासाठी विद्यमान कार्याध्यक्ष डॉ.संग्राम शिंदे यांची राज्याध्यक्ष म्हणून सर्व जिल्हा प्रतिनिधींच्या उपस्थितीत सर्वानुमते निवड करण्यात आली.समुदाय आरोग्य अधिकार्यांच्या हितासाठी सदैव कार्यरत राहण्याची ग्वाही डॉ.संग्राम शिंदे यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!