कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ पदग्रहण समारंभ
सांगली दि. 3:कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ प्रणित सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे पदाधिकारी व सदस्य यांना निवडपत्र प्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रा.दिलीप आ. जाधव यांनी सांगितले.
या समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून सुप्रसिद्ध कवयित्री सौ नीलम माणगावे ,अध्यक्ष म्हणून प्रा डॉ विष्णू वासमकर, मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर. जी. कुलकर्णी यांचे प्रमुख उपस्थितीत रविवार दिनांक 6/2/2022रोजी सकाळी 10.30वा.मथुबाई गरवारे कन्या महाविद्यालय ,सांगली येथे संपन्न होणार आहे.प्रा.सौ. मेघा अलासे, प्रा. सुनील गवारी, प्रा. बाबासाहेब पाटील, प्रा विजयकुमार शिंदे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात कोवीड -19च्या सर्व नियम पालन केले जाणार आहे.