ताज्या घडामोडी

लोणावळा ते औंढेखुर्द, औंढोली, पवनानगर मार्गे पौड मार्गावरील पुलाचे कामाला वेग

बीम उभे करण्यासाठी काँक्रीट मिक्सर कार्यरत.

Spread the love

लोणावळा ते औंढेखुर्द, औंढोली , पवनानगर मार्गे पौड मार्गावरील पुलाचे कामाला वेग ; बीम उभे करण्यासाठी काँक्रीट मिक्सर कार्यरत.Acceleration of bridge work on Paud road from Lonavla to Aundhekhurd, Aundholi, Pavananagar; Concrete mixer working to erect beams.

आवाज न्यूज  :  मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी १८ डिसेंबर.

लोणावळा ते औंढेखुर्द, औंढोली, पवनानगर मार्गे पौड मार्गावरील पुलाचे कामाला वेग आला आहे ; बीम उभेकरण्यासाठी काँक्रीट मिक्सर कार्यरत असल्याचे दिसले.येथून डोँगरगाव , कुसगाव ते खालापूर , या बारा किलोमीटर चा बोगदा खोदकाम पूर्ण झाले आहे. औंढेखुर्द येथील द्रुतगती मार्गाखालील पूल पाडून टाकल्याने औंढोली, औंढेखुर्द ग्रामस्थांचे वतीने काही महिन्यापूर्वी जोरात आंदोलन केले. रास्तारोको केला. यावेळी मावळचे आमदारांनी येवून रस्त्याचे काम पुर्ण पर्यायी व्यवस्था होईपर्यंत बंद करू देणार नाही. पुलाचे काम लवकरच सुरू करणार , असे आश्वासन दिले होते..त्याप्रमाणे काही दिवसापासून पुलाचे बीमसाठी खोदकाम करण्यात आले.आज पुलाचे बीममधे काँक्रीट मिक्सर भरण्याचे कामाला गती आली.सुमारे पाच ते सहा बीम या पुलासाठी उभारण्यात येणार असल्याचे येथील कामगारांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!