आरोग्य व शिक्षण

गवळी समाज सेवा संघ महाराष्ट्र “शाळेला चाललो आम्ही” शैक्षणिक उपक्रम रायगड येथे उत्साहात संपन्न

Spread the love

रायगड : गवळी समाज सेवा संघ महाराष्ट्र शाखा रायगड द्वारे रायगड जिल्ह्यातील समाजातील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटण्यात आले. या मध्ये इयत्ता पहिली ते चौथी व पाचवी ते दहावी असे किट बनवण्यात आले होते, मुख्य कार्यक्रम जिल्हातील मुरुड तालुका मध्ये वावडुंगी,काशीद व रोहा तालुका मध्ये धामणसई, येथे करण्यात आला. त्यानंतर ठरल्या प्रमाणे मुरुड व रोहा तालुका मधील बारशिव, वजरोली,डिंगणवाडी गावात ही वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.सुनीलजी कासार (पो.पाटील) व मा.श्री.ईश्वर चाचे (समाजसेवक) हे होते. प्रास्ताविक – जिल्हा खजिनदार दीपक वरणकर यांनी केले. सूत्रसंचालन – तळा संपर्क प्रमुख अविनाश काते यांनी केले व आभार प्रदर्शन जिल्हाध्यक्ष श्री.राजेश गायकर यांनी केले.
राज्याध्यक्ष अनिल कोटकर यांनी सेवा संघा बद्दल संपूर्ण माहिती दिली. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनीलजी कासार व ईश्वर चाचे यांनी उपस्थित विध्यार्थी यांना उत्तम मार्गदर्शन केले.मुख्य कार्यक्रम वावडुंगी ग्रामस्थ मंडळ वावडुंगी सर्व ग्रामस्थ तसेच मुंबई अध्यक्ष नंदकुमार वाजे, अनिल महाडिक पो.पाटील,उपसरपंच दिपेश वरणकर,ग्राम पंचायत सदस्या पूनम महाडिक, शिक्षक चेतन चव्हाण सर.यांच्या उपस्थितीत वावडुंगी येथील कार्यक्रम पार पडला.मुख्य कार्यक्रम काशीद समाजसेवक ईश्वर चाचे,नंदकुमार काते,सुनील दिवेकर,उमेश कासार,संतोष कासार,विजय शिंदे,राकेश कासार,तेजस काते,उमेश शर्मा,गणेश कासार,अमेय कासार,नितेश बोटे,अमित खेडेकर वरील सर्व गेस्ट हाऊस हॉटेल मालक तसेच सामाजिक कार्यकर्ते आहेत.यांच्या उपस्थितीत काशीद येथील कार्यक्रम पार पडला.मुख्य कार्यक्रम धामणसई
सुनीलजी कासार.पो.पाटील,सुशील घाटवल उपसरपंच,सुधीर घाटवल, नथुराम वरणकर, तेजस महागावकर,प्रशांत घाटवल, दीपाली ताई खेडेकर,नंदकुमार महाडिक यांच्या उपस्थितीत धामणसई येथील कार्यक्रम पार पडला.वरील सर्व सदस्य व सर्वच ग्रामस्थांनी मेहनत घेतली.
विद्यार्थी मित्र तसेच ग्रामस्थ मंडळी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.या कार्यक्रमाच्या वेळी राज्यकमिटी व जिल्हा कमिटी मुंबई येथुन प्रमुख पाहुणे म्हणून_राज्याध्यक्ष – अनिलजी कोटकर, रायगड जिल्हाध्यक्ष – राजेश गायकर , उपाध्यक्ष – वसंत जालगांवकर, राज्यसहखजिनदार – जय खेडेकर_तसेच रायगड जिल्ह्या चे सहसचिव योगेश घाटवळ, खजिनदार दीपक वरणकर, सहखजिनदार नरेश तटकरे, सहसंपर्क प्रमुख येमेश दर्गे, सल्लागार दिनेश नटे, तळा तालुका संपर्क प्रमुख अविनाश काते, अलिबाग तालुका प्रमुख नितीन कांबळे, तसेच कार्यक्रमाचे नियोजन मुरुड तालुका संपर्क प्रमुख रुपेश दिवेकर व सहसंपर्क प्रमुख संदीप महाडिक तसेच रोहा संपर्क प्रमुख विकास सारंगे व सहसंपर्क प्रमुख सुशील कासार यांच्या उत्तम नियोजन करून उपस्थित कार्यक्रम पार पडला.मुलांना हे शैक्षणिक साहित्य वाटप करुन खुप काही मोठ कार्य करतोय असे अजिबात नाही पण त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस हातभार लावण्याचा हा छोटासा प्रयत्न,यातुन आम्हाला काय मिळाले तर, मानसिक समाधान !! त्या मुलांना जेव्हा ते शालेय साहित्य मिळाले तेव्हा ती उघडुन पाहण्यासाठिची लगबग, दुस-याला आपल्या वस्तु दाखवताना त्यांच्या चेह-यावरचे कौतुक पाहताना जाणिव होते की चला कुणाच्यातरी चेह-यावर हसु फुलविण्यात आपण यशस्वी झालो ! ! अशी भावना यावेळी रायगड जिल्हध्यक्ष राजेश गायकर यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!