ताज्या घडामोडी

डॉ. मोझेस कोलेट यांचा राष्ट्रीय स्तरावर excellent Principal म्हणुन गौरव

Spread the love

बा. ना. बांदोडकर विज्ञान महाविद्यालयातील प्राचार्य कॅप्टन डॉ. मोझेस कोलेट यांचा excellent Principal म्हणून राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले.
कोरोना काळात महाविद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण, विविध सामाजिक उपक्रम देऊन(रक्तदान शिबीरं, E कचरा संकलन, शून्य प्लास्टिक उपक्रम, पाणी बचत आणि संवर्धन मोहीम, आपत्कालीन व्यवस्थापन कार्यशाळा, मुलींसाठी स्व संरक्षण कार्यशाळा, सायबर गुन्हे आणि संरक्षण कार्यशाळा, वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन, सर्वांसाठी योग कार्यशाळा, Fit India चळवळीत सहभागी, हिमोग्लोबीन वाढीसाठी प्रयत्न, क्षयरोग नियंत्रण जनजागृती मोहीम इ. )द्वारे विद्यार्थी शिक्षक यांचा व्यवस्थित समन्वय घडवून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी सुसुत्रता आणून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, शारीरिक व मानसिक आरोग्य याबरोबरच सामाजिक बांधिलकी हे कॉलेजचे vision आणि mission सार्थ करण्यात यशस्वी झालेले प्राचार्य, म्हणून तसेच विद्यार्थ्यांना विविध महाविद्यालयाशी जोडून विविध राष्ट्रीय अतंरराष्ट्रीय विविध स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग घेण्यास प्रेरणा देऊन. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास जागृत ठेवला, व महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांना भावनिक नाते जोडून दिलासा दिला. यामुळे त्यांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून” एक्सलंंट प्राचार्य ” म्हणून त्यांचा गौरव ठाकूर ट्रस्ट मुंबई यांच्या तर्फे व मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, विद्यार्थी व शिक्षकेत्तर सहकारी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!