आरोग्य व शिक्षण

सचिनभाऊ शेळके यांच्या स्मृतिदिनानिमित्त समाजगौरव पुरस्कार प्रदान

Spread the love

तळेगाव दाभाडे : पै. सचिनभाऊ बाळासाहेब शेळके यांच्या स्मृतिदिनानिमित्त शहरातील विविध क्षेत्रातील निरपेक्ष कार्य करणार्‍या व्यक्तींना समाजगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले.

दि. 5 एप्रिल रोजी इंद्रायणी मंगल कार्यालयात पै. सचिनभाऊ शेळके मित्र मंडळाच्या वतीने सचिनभाऊंच्या 6 व्या स्मृतिदिनी प्रतिमापूजन व अभिवादन समारंभात इंद्रायणी इंग्लिश स्कूलचे अध्यक्ष बाळासाहेब शेळके, साई स्टोन क्रशर उद्योग समुहाचे डायरेक्टर सुधाकर शेळके, इंद्रायणी उद्योग समुहाचे डायरेक्टर संतोष शेळके, माजी नगरसेवक संदीप शेळके, इंद्रायणी कार्यालयाचे संचालक संजय शेळके, सरस्वती विद्या मंदिरचे अध्यक्ष सुरेश झेंड, जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर आवारे, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस, वराळेचे माजी उपसरपंच निलेश शिंदे, आरपीआय कार्यकर्ते अनिल भांगरे, सुनिल पवार, मिलिंद बनसोडे, बाळा धामणकर, चेतन पालेकर, प्रदीप बनसोडे यांसह मंडळाचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते निरपेक्ष पत्रकारिता क्षेत्रात कार्य करणारे साप्ताहिक अंबरचे उपसंपादक अतुल पवार, एमपीसी न्युजचे उपसंपादक विवेक इनामदार, पत्रकार गणेश बोरुडे, आवाज न्यूजचे उपसंपादक राजेश बारणे यांसह वैशिष्ट्यपूर्ण वैद्यकिय क्षेत्रात कार्य करणारे नागरे अ‍ॅक्सिडेंट आणि जनरल हॉस्पिटलचे डॉ. नितीन नागरे, डॉ. सौ. सुरभी नागरे, डॉ. दत्तात्रय गोपाळघरे, डॉ. सुचित्रा नांगरे यांसह आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही द्रुतगती महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीत स्वखर्चाने मोफत पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करणारा पांगोळी, लोणावळा येथिल सिद्धेश गायकवाड यास रोख रक्कम 11 हजार रुपये व सन्मानचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला.

तसेच कोविड काळातील लॉकडाऊनमध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी २४ तास झटणारे पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांचा गौरव करण्यात आला. तसेच अंबिका स्टोन क्रशर उद्योग समुहाचे डायरेक्टर विलास काळोखे, नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे, विद्युत विभाग प्रमुख श्रुती ठाकरे, किनारा वृद्धाश्रमाच्या प्रीती वैद्य, फ्रेन्डस् ऑफ नेचरचे महेश महाजन, सीए स्वानंद आगाशे, वन्यजीव रक्षक संस्था, सर्पमित्र निलेश गराडे, भास्कर माळी, सुभाष नलावडे त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारे मिलिंद अच्युत, सुनील जैन, शेखर खोमणे, अनिल धर्माधिकारी, सुशांत ननवरे, अमित प्रभावळकर, संदीप गोंदगावे, पोलीस प्रशासनाचे बाबाराजे मुंडे, प्रशांत वाबळे रमिताई गुडगेरी, काजल आघाव, यांना आपापल्या क्षेत्रात कोविडसह आजवर केलेल्या निरपेक्ष कार्याबद्दल समाजगौरव पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी पत्रकार अतुल पवार डॉ. नितीन नागरे, डॉ गोपाळघरे, पो.नि.अमरनाथ वाघमोडे, प्रीती वैद्य, सिद्धेश गायकवाड आदींनी भावना व्यक्त केल्या. सूत्रसंचालन क्रीडाशिक्षक विशाल मोरे यांनी केले. आभार माजी नगरसेवक संदीप शेळके यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!