ताज्या घडामोडी

बिळाशी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. सुवर्णाताई साळुंखे यांची बिनविरोध निवड

Spread the love

कोकरुड/ वार्ताहर
बिळाशी ता शिराळा येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी भाजपच्या सौ. सुवर्णाताई विजय साळुंखे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपसरपंच दत्तात्रय मगदूम यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्यानंतर झालेल्या रिक्त उपसरपंच पदासाठी सौ. सुवर्णाताई विजय साळुंखे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने त्या बिनविरोध निवडून आल्या. सरपंच कल्पना दादासो यमगर यांच्या अध्यक्षतेखाली हि निवड करण्यात आली. दुपारी निवड जाहीर होताच कार्यकत्यांनी गुलालाची उधळण करित, फटका लावून आनंद साजरा केला. दरम्यान भैरवनाथ मंदीरात झालेल्या सत्कार समारंभात नुतन उपसरपंच सौ सुवर्णाताई विजय साळुंखे यांचा शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.याप्रसंगी माजी उपसभापती आनंदराव पाटील, डॉ अनिल साळुंखे, प्रचितीचे संचालक एस. वाय यमगर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी सरपंच विश्वास पाटील, निनाईचे संचालक बाजीराव पाटील, सेवा सोसायटी चेअरमन आनंदराव शिराळकर, ग्रामविकास अधिकारी योगेश नाईक, शेतकरी संघटनेचे देवेंद्र धस,
ग्रामपंचायत सदस्य विजय रोकडे, चंद्रकांत साळुंखे, विकास पांढरे, सुवर्णा पाटील, इंदुताई यमगर, सरिता पाटील, सुजाता देशमाने, सिंधुताई साळुंखे, दिनकर साळुंखे, नामदेव साळुंखे, दिलीप कुंभार, डॉ. इंद्रजित यमगर, विलास रोकडे, दत्तात्रय शिपेकर, अंकुश पाटील, मारुती पाटील,आनंदा पाटील, संतोष पाटील, शंकर पाटील, शिवाजी कांबळे, सुरेश पाटील, प्रकाश नायकल, रामचंद्र सातपुते, दिलीप भोगावकर वैभव सातपुते, अधिक पाटील, संजय साळुंखे,अनिल लोहार, अमित यमगर,संग्राम लोहार, गणेश साळुंखे, राजेंद्र जंगम,महादेव साठे, सचिन साठे आदींसह बिळाशी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. सुत्रसंचालन आनंदा पाटील, प्रास्ताविक विलास रोकडे तर आभार माजी सरपंच बी. एम. साळुंखे यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!