ताज्या घडामोडी

शिराळा – वाळवा तालुक्यात विकास कामे मार्गी – रणधीर नाईक.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / शिराळा मतदारसंघांमध्ये विकास कामे करण्यासाठी माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांचे माध्यमातून पाया रचला असून त्यांच्याकडून शिराळा वाळवा तालुक्यातील गावांमध्ये प्रचंड मोठी विकास कामे मार्गी लागली असल्याचे समाधान सर्वच स्तरातून व्यक्त होत असल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष रणधीर नाईक यांनी केली.
पाचुंब्री (ता शिराळा) येथील जोतिबा मंदिराच्या परिसरामध्ये शिराळा पंचायत समितीच्या माजी सदस्य सौ सारिका पाटील यांच्या स्वीय निधीमधून मंजूर झालेले पेविंग ब्लॉक कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी सदस्य रणधीर नाईक यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.
नाईक पुढे म्हणाले, शिराळा उत्तर विभागातील जनतेने शिवाजीराव नाईक यांच्यासारखे राजकीय सुसंस्कृत व्यक्तिमत्त्व घडवल्याने शिराळा व वाळवा तालुक्यातील सर्व गावांमध्ये व वाडी वस्तीवर मोठ्या प्रमाणात विकासकामे मार्गी लागलेली पहावयास मिळत आहेत. नाईक साहेबांच्याकडे आसलेल्या कवश्यल्यामधुन व झालेल्या विकास कामामुळे शिराळा तालुक्याच्या लौकिकामध्ये भर पडली आहे. यामधून राज्यांमध्ये शिराळा विधानसभा मतदारसंघाची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. याचा सार्थ अभिमान मतदारसंघातील सर्व जनतेला असल्याचे मत नाईक यांनी व्यक्त केले.
यावेळी यशवंत दूध संचालक शंकरराव पाटील, सोसायटी चेअरमन रंगराव माने, उपसरपंच राजेंद्र पाटील, प्रकाश पाटील, प्रमोद पाटील, राहुल शहा, बाळकृष्ण पाटील, मारुती पाटील ,दिलीप झेंडे, हर्षद माने ,भीमराव झेंडे ,वसंत माने आधी मान्यवर उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!