ताज्या घडामोडी

हसबनीस व गायकवाड कुटुंबियांकडून शिराळा नगरपंचायतच्या स्वच्छता करणाऱ्या महिलांचा कामगारांचा सन्मान.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी

शिराळा नगरपंचायतकडून घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत दैनंदिन स्वरूपात घरोघरी जाऊन कचरा संकलनाचे काम केले जाते. नगरपंचायत कडील चार घंटा गाड्या व एक ट्रक्टर त्यांच्यासोबत असणाऱ्या महिला मदतनीस संपूर्ण शहरातील कचरा गोळा करण्याचे काम करत असतात. तसेच नगरपंचायतकडील सफाई कामगारांपैकी घनकचरा व्यवस्थापन प्रक्रिया केंद्रावर संकलित करण्यात आलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम नियमितपणे दैनंदिन स्वरूपात करतच असतातच. सध्याच्या पावसाच्या दिवसातही या महिला अथकपणे शहरातील कचरा गोळा करण्याचे व संकलित कचऱ्यावर प्रक्रिया करण्याचे काम अविरतपणे आज अखेर करत आहेत. त्यांच्या याच कामाची दखल घेत ते करत असलेल्या कर्तव्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक प्रांजळ उपक्रम शिराळा शहराचे जागरूक नागरिक माजी ग्रामपंचायत सदस्य दिनेश हसबनीस व अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक गायकवाड यांनी संयुक्तपणे आज नगरपंचायत कार्यालयात राबविला.
दिनेश हसबनीस, सौ. वैजयंती हसबनीस व विनायक गायकवाड सौ. शीतल विनायक गायकवाड यांनी आज शिराळा नगरपंचायतकडील सर्व महिला सफाई कामगारांना साडीचोळी देऊन त्या करत असलेल्या कामाबद्दल मन:पूर्वक आभार व्यक्त केले. त्यांच्या या कर्तव्यदक्षतेमुळेच शिराळा शहर स्वच्छ व आरोग्यदायी रहात असल्याची भावनाही यावेळी दोन्ही दाम्पत्यानी व्यक्त केली. यावेळी शिराळा नगरपंचायतचे प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील, सेवानिवृत्त तालुका कृषी अधिकारी किशोर हसबनीस, विशेष कार्यकारी अधिकारी रवींद्र कदम तसेच नगरपंचायतच्या सर्व विभागांचे विभाग प्रमुख, लिपिक व इतर कर्मचारी उपस्थित होते. प्रशासक तथा मुख्याधिकारी योगेश पाटील यांनीही गायकवाड व हसबनीस कुटुंबाने दाखविलेल्या दातृत्वाबाबत कर्मचार्यांच्या वतीने शाल व वृक्ष रोप देऊन आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!