ताज्या घडामोडी

दालमिया शुगर युनिट करुंगलीची अतिरिक्त एफ.आर.पी. रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा: युनिट हेड संतोष कुंभार

Spread the love

कोकरुड/ वार्ताहर

दालमीया भारत शुगर इंडस्ट्रीज युनिट करूंगली- आरळा ता.शिराळा या कारखान्याच्या गळीत हंगाम सन 2021- 22 मध्ये झालेल्या ऊस बिलापोटी शासनाच्या वाढीव एफ. आर.पी .नुसार प्रति टन 50 रुपये फरकाची रक्कम ऊस उत्पादकाच्या खात्यावरती अदा करण्यात आली असून फरकाची रक्कम जमा करणारा हा कारखाना
महाराष्ट्र राज्यात पहिला कारखाना ठरला आहे. अशी माहिती कारखाना कार्यस्थळावर झालेल्या पत्रकार परिषदेत कारखान्याचे युनिट हेड संतोष कुंभार यांनी दिली. यावेळी बोलताना कुंभार पुढे म्हणाले की,
गळीत हंगाम सन 20२१- २२ मध्ये कारखान्याने ४,६१,०९५ मे.टन. उसाचे गाळप केले होते मागील एफ आर पी च्या आदेशानुसार २९६८ रुपये प्रति टनाप्रमाणे रक्कम यापूर्वी अदा केली आहे. शासनाच्या सुधारित परिपत्रकानुसार साखर उतारा व तोडणी खर्च यांचा विचार करून एफ. आर.पी. मध्ये प्रति टन ५० रुपये वाढ झाली आहे.त्यामुळे उर्वरित प्रति टन 50 रुपये प्रमाणे हंगाम 2021-22 मध्ये ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दिनांक 13 जुलै 2022 रोजी जमा केले आहे. एकूण एफ.आर.पी.प्रमाणे प्रति टन ३०१८ रुपये प्रमाणे सर्व शेतकऱ्यांना दिले आहे. दालमिया व्यवस्थापनाने कारखाना सक्षमपणे चालवून गतवर्षीचा हंगाम यशस्वी केला आहे. आगामी सन २०२२-२३चा गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी कारखान्यामध्ये जय्यत तयारी सुरू आहे. ऊस तोडणी वाहतूक यंत्रणाचे करार पूर्ण झाले असून त्यांना ऍडव्हान्स वाटप पूर्ण झाले आहे. यापुढेही शेतकऱ्यांच्या ऊसाला शासनाच्या नियमाप्रमाणे ऊस दर देणार असून शेतकऱ्यांनी दर्जेदार व परिपक्व ऊसाचा जास्तीत जास्त ऊस पुरवठा करावा. असे आवाहन केले आहे. यावेळी एच.आर. हेड महेश कवचाळे, ॲडमिन ऑफिसर शिवाजी पाटील,ऊस विकास अधिकारी युवराज चव्हाण, शेती अधिकारी मनोहर मिसाळ आदींसह उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!