आरोग्य व शिक्षण

बोरघाटात एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; तिघांचा जागीच मृत्यू

Spread the love

लोणावळा :आज (18 ऑक्टोबर) सोमवारी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर सहा वाहनांचा एकमेकांवर आदळल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात कारचा चक्काचूर झाला असून तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

प्राथमिक माहितीनुसार रस्त्याच्या कडेला कोंबड्यांनी भरलेला ट्रक उभा होता. या ट्रकला कार धडकली. कारवर मागून येणाऱा भरधाव ट्रेलर धडकला. त्यानंतर टेम्पोने बसला धडक दिली. या विचित्र अपघातात तीन जण जागीच ठार झाले असून जखमींना जवळील इस्पितळात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!