आरोग्य व शिक्षण

भाजे येथील जेष्ठ वारकरी श्रीमती यमुनाबाई पदमुले यांचे निधन

Spread the love

लोणावळा : भाजे येथील जेष्ठ वारकरी श्रीमती यमुनाबाई दामू पदमुले ( वय ८२ ) यांचे आल्पशः आजाराने आज सोमवारी (ता.१८ )रोजी पहाटे निधन झाले.

त्यांच्या  पश्चात एक विवाहित मुलगा ,एक विवाहित मुलगी , सून, जावई,नातवंडे ,पतवंडे , जावई आसा परिवार आहे.

भाजे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व भाजे विकास सोसायटीचे माजी चेअरमन नंदकुमार दामू पदमुले हे त्यांचे सुपुञ होत.

कै.यमुनाबाई पदमुले यांचे पार्थिवावर भाजे येथील तळ्याकाठी स्मशानभूमित शोकाकूल वातावरणात आंत्यसंस्कार करण्यात आले. कै.पदमुले यांनी आनेक वर्षे पंढरपूर , आळंदी व ञ्यंबकेश्वरची पायी वारी केली आहे.

यावेळी खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन भाऊसाहेब मावकर , कार्लाचे उपसरपंच किरणशेठ हुलावळे , किर्तनकार तुषार महाराज दळवी , देवलेचे माजी सरपंच आनिल आंबेकर यांनी श्रध्दांजली वाहिली. यावेळी सहकार महर्षी व जेष्ठनेते  माऊली दाभाडे , राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुका कार्याध्यक्ष दिपक हुलावळे , तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी भेटून सांत्वन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!