ताज्या घडामोडी

युवाशक्ती प्रतिष्ठान तर्फे ‘ शैक्षणिक पाठ्यपुस्तके ‘भेट

Spread the love

खानापूर येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या महात्मा गांधी विद्यालयातील ग्रंथालयासाठी युवाशक्ती प्रतिष्ठान (१९९९ ची इयत्ता १० वी ची बॅच) तर्फे विज्ञान शाखेसाठी इयत्ता ११ वी व १२ वी ची सुमारे १० हजारांचे शैक्षणिक पाठ्यपुस्तके भेट दिली.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.भाऊसाहेब ढोले ( उपविभागीय पोलीस अधिकारी हवेली विभाग पुणे ग्रामीण) व जेष्ठ इतिहास संशोधक पत्रकार दत्ताजी नलावडे यांचे हस्ते शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.सदर उपक्रम राबविल्याबद्दल प्रमुख पाहुणे ढोले व नलावडे यांनी युवाशक्ती प्रतिष्ठानच्या उपक्रमांचे कौतुक केले.युवाशक्ती प्रतिष्ठानने ग्रंथालयास पाठ्यपुस्तके भेट दिल्याबद्दल अभिनंदन केले.युवाशक्ती प्रतिष्ठान चे शशिकांत किवळे यांनी प्रास्ताविक केले.विद्यालयाच्या ग्रंथालयास पाठ्यपुस्तके मिळविण्यासाठी जेष्ठ शिक्षक शशिकांत जाधव यांनी पाठपुरावा केला.सुधाकर गायकवाड व शिल्पा गायकवाड यांनी सायन्सच्या एका विद्यार्थ्यी नीची शैक्षणिक फी भरून सहाय्य केले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जेष्ठ इतिहास संशोधक दताजी नलावडे होते.यावेळी भाऊसाहेब ढोले,दत्ताजी नलावडे,मुख्याध्यापक म्हाळसाकांत खेडेकर,लक्ष्मण माताळे,तानाजी खिरीड,सुधाकर गायकवाड यांनी युवाशक्ती प्रतिष्ठान च्या उपक्रमांचे कौतुक केले.पर्यवेक्षक डी.बी.यादव, प्रतिष्ठान चे कार्यकर्ते व माजी विद्यार्थी धनंजय सपकाळ,सचिन यादव,नवनाथ जावळकर,अजय काकडे,योगेश सर्जेराव,शिरीष कुलकर्णी,अनंत लोहकरे,नितीन शहाडे,यांनी शैक्षणिक पाठ्यपुस्तके विद्यालयास देण्यासाठी हातभार उचलला.सूत्रसंचालन जेष्ठ शिक्षक शशिकांत जाधव यांनी केले व आभार प्रा.कीर्ती जाधव यांनी मानले.शिक्षक-शिक्षकेतर सहकारी व विद्यार्थ्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!