ताज्या घडामोडी

क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार

Spread the love

प्रमोद पाटील
पालघर जिल्हा प्रतिनिधी ता.२७

वर्तमान पिढीला मार्गदर्शन करुन भविष्यकालीन पिढी घडवण्याचे काम शिक्षक करत असतो. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षकांना पुरस्कार देण्यात येतात. शिक्षण हा समाजाच्या सर्वांगीण विकासाचा पाया आहे. समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांमुळेच समाज आणि राज्याचा तसेच राष्ट्राचा विकास होतो. अशा समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या शिक्षकांना राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्काराने गौरविले जाते.

शैक्षणिक वर्ष २०२२ साठी हे पुरस्कार वस्तूनिष्ठ निकषाव्दारे प्रदान करण्यात येणार आहेत. आवेदने सादर करू इच्छिणाऱ्या प्राथमिक, माध्यमिक/उच्च माध्यमिक शिक्षकांनी पुढे नमूद केल्यानुसार वेबलिंकवर https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfnHr3svcX256Ky2qc Gi8R4 EY XWyVrLvF7E4f44 दिनांक पासून & GWvW9Q/viewform ?pli=1 या लिंकवर आपली आवेदने दिनांक २८ जुलै, २०२२ पासून ७ ऑगस्ट, २०२२ पर्यंत सादर करावीत. अशी माहिती शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालय, म.रा., पुणे महेश पालकर यांनी दिली आहे.

शालेय शिक्षण विभागाच्या या प्रोत्साहनपर कार्यक्रमाचे भारत आणि स्काऊटस् गाईडचे सह आयुक्त जितेंद्र महाजन यांनी स्वागत केले आहे. क्रीडा शिक्षक विजय अवसरमोल यांच्या मते पुरस्कार हे उत्कृष्ट कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्राप्त झाल्यास इतरांना त्या पासून स्फुर्ती मिळते व त्यातूनच नवसृजनशीलता घडते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!