ताज्या घडामोडी

स्पर्धेच्या युगात गुणवत्ते शिवाय पर्याय नाही ग्रामीण विद्यार्थ्यांनी उज्वल यश संपादन करून स्वतःचे गाव -शाळा व विवेकानंद शिक्षण संस्थेचा नावलौकिक वाढवावा-प्राचार्य मिलिंद हुजरे

Spread the love

इंग्लिश स्कूल वांगी येथे गुणवत्ता वाढ शिबिर उत्साहात

कडेगाव दि 27 (वार्ताहर )स्पर्धेच्या युगात गुणवत्ते शिवाय पर्याय नाही म्हणून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम घेवून उज्वल यश संपादन करावे व स्वतःचे गाव – शाळा व स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचा नावलौकिक वाढवावा असे आवाहन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे सांगली जिल्हा विभाग प्रमुख आजीव सेवक प्राचार्य मिलिंद हुजरे यांनी केले.
ते न्यू इंग्लिश स्कूल वांगी ता.कडेगाव येथे कामेरी, मसुचीवाडी,आळसंद,नागराळे,वांगी,
भिकवडी खुर्द,कडेपूर ,तोंडोली ता शाळातील 85 टक्या पेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित 10 गुणवत्ता वाढ शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना माजी विभाग प्रमुख संसंस्थेचे आजीव सदस्य व्ही.एस.पाटील यांनी विद्यार्थ्यांनी या शिबिराच्या माध्यमातून किमान 10 टक्के गुण कसे वाढतील यासाठी प्रयत्न करावेत.यासाठी अभ्यासाचे स्वतःचे नियोजन करावे व नियमित अभ्यास करावा .जीवनाला योग्य दिशा मिळावी म्हणून चांगले कर्म करावे .वांगी ग्रामस्थांनी शाळेसाठी भव्य इमारत उभारण्यासाठी पाठपुरावा करावा असे आवाहन ही त्यानी केले.
या गुणवत्ता वाढ शिबिरात तज्ञ मार्गदर्शन म्हणून
सौ. झांबरे. एस. एन मराठी, संकपाळ. बी. आर हिंदी ,कु. गडवीर.ए.एन.इंग्रजी, घाडगे एस. आर.गणित 1, सुतार ए.एस.गणित 2, देशमुख एस. के.विज्ञान 1, कदम. एस. बी.विज्ञान 2
सौ. देशमुख व्ही. जे.इतिहास पाटील जे.एम.
भूगोल यांनी काम पाहिले .या कार्यक्रमास सरपंच विजय होनमाने,उपसरपंच सौ.मनीषा पाटील,,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सूर्यकांत सूर्यवंशी, उपाध्यक्ष रमेश एडके, प्राचार्य व्ही. एच.पाटील, मुख्याध्यापिका सौ.एस.ए. पाटील,डी. टी. जाधव,एस. एस.गवळी यांचेसह मुख्याध्यापक , शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते.मुख्याध्यापक सी.व्ही. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.पी. एन.पवार यांनी सूत्रसंचालन केले तर शेवटी प्रदीप यादव यांनी आभार मानले-न्यू इंग्लिश स्कूल वांगी येथे
10 गुणवत्ता वाढ शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना .प्राचार्य मिलिंद हुजरे सोबत माजी विभाग प्रमुख व्ही.एस.पाटील ,सरपंच विजय होनमाने,उपसरपंच सौ.मनीषा पाटील, सूर्यकांत सूर्यवंशी, रमेश एडके, प्राचार्य व्ही. एच.पाटील, मुख्याध्यापक सी.व्ही. पाटील उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!