क्रीडा व मनोरंजनमावळसामाजिक

मोहम्मद रफी यांच्या जयंती निमित्त “स्व मोहम्मद रफी फॅन क्लब” तळेगाव दाभाडे यांच्या वतीने सदाबहार गाण्याचा कार्यक्रम संपन्न.

Spread the love

मोहम्मद रफी यांच्या जयंती निमित्त “स्व मोहम्मद रफी फॅन क्लब” तळेगाव दाभाडे यांच्या वतीने सदाबहार गाण्याचा कार्यक्रम संपन्न.On the occasion of Mohammad Rafi’s birth anniversary, “Swa Mohammad Rafi Fan Club”, Talegaon Dabhade, conducted an evergreen song program.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २५ डिसेंबर.

मोहम्मद रफी फॅन क्लब” तळेगाव दाभाडे यांचे वतीने,दर वर्षी प्रमाणे या वर्षी देखील दि २४ डिसेंबर रोजी स्व. मोहम्मद रफी यांची जयंती निमित्ताने “स्व मोहम्मद रफी फॅन क्लब” तळेगाव दाभाडे यांचे वतीने सदाबहार गाण्याचा कार्यक्रम, लायन्स क्लब तळेगाव दाभाडे येथे आयोजित करण्यात आला होता.

यावेळी, कार्यक्रमाचे, दीपप्रज्वलन व पुष्पहार पंडित किरण परळीकर, माजी नगरसेविका कल्पनाताई भोपळे, मोहम्मद रफी फॅन क्लब चे संस्थापक व माजी नगरसेवक सूर्यकांत काळोखे मा. सभापती ब्रिजेंद्र किल्लावाला, माजी नगरसेवक संतोष हरिभाऊ दाभाडे, उद्योजक बाबा चौरे, मोहम्मद रफी फॅन क्लबचे अध्यक्ष नितीन खळदे, बाळकृष्ण लोणकर आदी मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमामध्ये अनेक गायकांनी भाग घेतला त्यामध्ये संस्थापक सदस्य सतिश देशपांडे, माजी नगरसेवक संतोष हरिभाऊ दाभाडे, चीफ इंजिनिअर (त दा न प ) मल्लिकार्जुन बनसोडे, सुभाष वाळुंज ,अमोल बर्वे, नागराज मुंडरर्गी, सुरेश काळे, वरदा मातापूरकर, आयशा सय्यद, विजय चौधरी, प्रकाश हेरेकर, सोनाली यादव, आरिफ सय्यद आदी 25 गायकांनी भाग घेतला.

साउंड सिस्टमची जबाबदारी ; विजय चौधरी यांनी उत्तमप्रकारे पारपाडली.मोहम्मद रफी फॅन क्लबचे सभासद बाळकृष्ण लोणकर, बशीर पठाण, अमित कुलकर्णी, तुषार खेर्डे, यश हंबीर, पराग गायकवाड रवींद्र वैद्य आदी सभासदांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन ज्येष्ठ सभासद अनिल धर्माधिकारी यांनी केले .यावेळी तळेगाव दाभाडे शहरातील ज्येष्ठ पत्रकार पंडित सुरेश साखळकर साहेब , विलास भेगडे, अमीन खान, महेश भागीवंत, रेखा भेगडे, जमीर नालबंद सह महान गायक मोहम्मद रफी यांचे चाहते, रसिकवर्ग, मोठ्याप्रमाणात नागरिक उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!