आरोग्य व शिक्षणमावळ

देहूरोड येथील श्री शिवाजी विद्यालयात दोन दिवसीय “उद्योजकता व व्यक्तिमत्व विकास” शिबिर उत्साहात संपन्न.

तांत्रिक शिक्षणाच्या जोरावर तरुण देशांतर्गत स्वयंरोजगार करू शकतात,पर्यायाने बेरोजगारीही कमी होते. प्रा.शरद वाजे

Spread the love

देहूरोड येथील श्री शिवाजी विद्यालयात दोन दिवसीय “उद्योजकता व व्यक्तिमत्व विकास” शिबिर उत्साहात संपन्न.A two-day “Entrepreneurship and Personality Development” camp concluded with enthusiasm at Shri Shivaji Vidyalaya, Dehurod.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर देहूरोड  प्रतिनिधी २५ डिसेंबर.

देहूरोड येथील श्री शिवाजी विद्यालयात दोन दिवसीय “उद्योजकता व व्यक्तिमत्व विकास” शिबिर उत्साहात संपन्न झाले.पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे श्री शिवाजी विद्यालय,देहूरोड व पुणे जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय,घोले रोड यांच्या संयुक्त विद्यमाने उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी “उद्योजकता व व्यक्तिमत्व विकास” प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला.१८व १९ डिसेंबर रोजी सकाळी ९ ते १२ वाजता होणाऱ्या या शिबिराचे उद्‍घाटन विद्यालयाच्या प्राचार्या सौ.आर.एम.सपकाळे मॅडम यांच्या हस्ते झाले. इ.११ वी आणि १२ वीला शिकत असलेल्या ११० विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतला.

उद्योजक राष्ट्राच्या प्रगतीचा कणा आहे, कारण ते रोजगाराच्या संधी निर्माण करतात. मनातील नवनवीन कल्पना साकार करण्यासाठी ते प्रयत्न करतात तसेच उद्योजकता ही देशाची संपत्ती असते आणि अनेक तरुणांमध्ये उद्योजक प्रवृत्ती दडलेली असते.या प्रवृत्तीला प्रेरणा दिली तर त्या तरुणांमधून चांगला उद्योजक जन्माला येतो, जो पुढे चालून देशाच्या संपत्तीत भर घालू शकतो असे प्रतिपादन प्रा.महादेव वाघमारे यांनी केले.उद्योजकता विकास प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते.

दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रामध्ये प्रा.डी.एन.सोनकांबळे यांनी आपल्या मतांशी एकनिष्ठ राहून दूरदृष्टीने,काळाची गरज लक्षात ठेवून जेव्हा एखादा उद्योजक वाटचाल करतो त्यावेळी उज्ज्वल भविष्याची ती नांदी असते. म्हणूनच उद्योजकाचे व्यक्तिमत्त्व हे सर्वसमावेशक असेल तर आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून लोकांसमोर एक नवा धडा तो तयार करून देतो आणि खऱ्या अर्थाने यशस्वी उद्योजक म्हणून उदयालाही येतो.

दुसऱ्या सत्रामध्ये प्रा.शरद वाजे यांनी आवाहन पेलण्यात आजची पारंपारिक शिक्षण पद्धती तोकडी आहे, हे युग तांत्रिक शिक्षण देण्याचे आहे. तांत्रिक शिक्षणाच्या जोरावर हे तरुण देशांतर्गत स्वयंरोजगार करू शकतात,पर्यायाने बेरोजगारीही कमी होते,तसेच आजचे B.A., B.Com., B.Sc. त्यापैकी किती लोकांना नोकरी मिळते? किंवा किती लोक यशस्वी होतात ? याचे आत्मपरीक्षण होणे गरजेचे आहे असे प्रतिपादन केले.तसेच आजचे पारंपारिक शिक्षण न घेता वैशिष्ट्यपूर्ण कौशल्यप्राप्तीच्या दृष्टीने घेतलेले शिक्षण नोकरी देऊ शकते, त्याचबरोबर स्वयंरोजगार करण्याचे आवाहन पेलू शकते, म्हणून पालकांनी आपली मुले दहावीनंतर व्यवसाय अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतील यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजे असे आवाहन केले.

देहूरोड येथे झालेले हे शिबिर श्री शिवाजी विद्यालयाच्या व्यवसाय अभ्यासक्रम विभागाने आयोजित केले होते.विभाग प्रमुख  शैलेंद्रसिंग परदेशी यांनी प्रास्ताविक केले.तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. जे.एस.ओझर्डे यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आलेल्या पाहुण्यांचे स्वागत प्रा. एस.एस.कोंडे व प्रा. आर.आर.देशपांडे सर आणि सत्कार  सविता नाणेकर यांनी केले. तसेच प्रा. डी.एच.रासकर सर यांनी सर्वांचे आभार मानले.

विशेष अतिथी म्हणून प्रा.मिलिंद शेलार सर उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सेवक  अनंता वाजे व  निलेश टिळेकर यांनी विशेष मेहनत घेतली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!