ताज्या घडामोडी

सहकारातील आदर्शवत व्यक्तिमत्व आनंदराव माईंगडे

Spread the love

कोकरुड/ प्रतिनिधी

महाराष्ट्रातील ग्रामिण अर्थव्यवस्थेचा कणा
म्हणुन सहकार चळवळीकडे पाहिले जाते. महाराष्ट्रातील ग्रामिण जनतेची व कष्टकऱ्यांची पत समाजामध्ये उंचावण्यासाठी सहकार चळवळ मोलाचे योगदान देत आहे. यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात अनेक पतसंस्था यामध्ये अग्रभागी आहेत. यापैकीच सहकार क्षेत्रात गेली ३५ वर्षात आदर्शवतपने काम करीत. आथिॅक स्वावलंबित्वाबरोबरच सामाजिक बांधिलकी म्हणून पश्चिम उपनगरात आपला नावलौकिक कायम ठेवला आहे. अशी पतसंस्था म्हणजे कार्यकुशल व अनुभवसंपन्न संस्थापक /अध्यक्ष आनंदराव माईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्शवत वाटचाल करणारी दत्तसेवा सहकारी पतपेढी मर्यादित, मुंबई ही होय.
या संस्थेच्या आदर्शवत वाटचालीची दखल घेऊन अखिल भारतीय ग्रामिण पत्रकार संघाच्या वतीने ठाणे येथे राज्यस्तरीय अधिवेशनामध्ये संस्थेचे संस्थापक /अध्यक्ष आनंदराव माईंगडे यांना ‘सहकाररत्न’ पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
.याबद्दल दत्तसेवा सहकारी पतपेढीच्या कार्याचा थोडक्यात आढावा..कोल्हापूर जिल्ह्यात शाहूवाडी तालुक्यातील तुरुकवाडी सारख्या दुर्गम भागातील खेड्यात सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या आनंदराव माईंगडे यांना कुटुंबांच्या उदरनिर्वाह चालवण्यासाठी शिक्षण अर्धवट सोडून मुंबईत यावे लागले. मुंबईत सुरवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. कमी पगाराची नोकरी करत रात्रशाळेत मध्ये आपले शिक्षण पूर्ण केले.
समाजाच आपण काहीतरी देन लागतो, म्हणुन आपण समाजासाठी काहीतरी करावे या उदात्त हेतूने आनंदराव माईंगडे यांनी सन १९८७ साली मालवणी सारख्या दुर्गम भागात राहत्या घरात मोजक्या सहकाऱ्यांसमवेत दत्तसेवा सहकारी पतपेढीची स्थापना केली. सुरुवातीपासून तत्पर, आपुलकीची व विनम्र सेवा देत. सभासद वाढीसाठी प्रयत्न करण्यात आला. अतिशय पारदर्शकपणे करत असलेल्या संस्थेच्या कामामुळे सभासदांच्या, खातेदारांच्या विश्र्वासास पात्र होऊ लागली. परिसरातील होतकरू गरीब, छोटे -मोठे व्यावसायिकांना उद्योग व्यवसायासाठी केलेल्या आर्थिक सहकार्यामुळे त्यांचा विश्वास अधिकच संपन्न होत गेला आणि संस्थेचा वटवृक्ष होऊ लागला आहे. आज संस्थेने 35 व्या वर्षात यशस्वी पदार्पण केली असून संस्थेच्या मालवणी ,गोरेगाव, गोराई ,जोगेश्वरी( प ),कांदवली ,जोगेश्वरी, घाटकोपर ,मालाड ,वसई, नायगाव, दहिसर ,भांडुप, म्हाडा -मालवणी, नालासोपारा, अंधेरी (पूर्व) तुरुकवाडी (कोल्हापूर) शेडगेवाडी (सांगली )बांबवडे (कोल्हापूर ) या १८ शाखांसह संगणीकृत व मुख्य कार्यशाखांमधून चांगल्या प्रकारे ग्राहकांना सेवा देत आहेत. संस्थेचे सध्या खेळते भांडवल ३२८ कोटी असून २१८ कोटी ठेवी आहेत. कर्ज १९५ कोटी व संस्थेचा संमिश्र व्यवसाय 415 कोटी आहे. संस्थेची सभासद संख्या ६७,००० एवढी आहे.संस्थेत सध्या१५० प्रशिक्षित कर्मचारी व 125 दैनंदिन प्रतिनिधी कार्यरत आहेत. आतापर्यंत संस्थेने विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवले आहेत. यामध्ये दुष्काळग्रस्त भागांकरिता मुख्यमंत्री सहायता निधीस ५,००,०००/- (पाच लाखाची )मदत केली आहे. संस्थेच्या रोप्यमहोत्सवी वर्षानिमित्त महापौर निधीस २५,०००/- (पंचवीस हजाराची )मदत केली आहे. कोरोना काळात ग्रामीण भागातील लोकांची कोरोना तपासणी करता यावी याकरिता शाहूवाडी तालुक्याचे तहसीलदार यांच्याकडे संस्थेने ५१ हजार रुपयांचे साहित्य प्रदान करण्यात आले. सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सन १८-१९ ला आलेल्या महापुरा प्रसंगी नुकसानग्रस्त कुटूंबाना जीवनावश्यक वस्तूं व धान्यांचे वाटप करण्यात आले होते.राज्यात कोरोना महामारीने निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून संस्थेने महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री माननीय राजेश टोपे यांना १,५१,०००/-( एक लाख एक्कावन्न हजार) रुपयांचा धनादेश देण्यात आला. संस्थेने गावामध्ये दत्त मंदिराची स्थापना करुन दत्त जयंती उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. ग्रामीण भागातील महिलांना छोटे छोटे व्यवसाय उद्योगधंदे सुरू करता यावी यासाठी तात्काळ कर्ज पुरवठा करण्यात येतो. महिलांसाठी संस्थेने विविध योजना राबविण्यात येतात. महिलांना संस्थेच्या विविध योजनांची माहिती व्हावी. शासकीय योजनांची माहिती व्हावी दरवर्षी महिला मेळावा आयोजित केला जातो. संस्थेला पश्चिम उपनगरे जिल्हा सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने 50 कोटी पेक्षा जास्त खेळते भाग भांडवल असणाऱ्या संस्थांमधून प्रथम क्रमांकाचा आदर्श संस्था पुरस्कार मिळालेला आहे मुंबई विभागीय पतसंस्था फेडरेशनच्या वतीने उत्कृष्ट अहवाल मूल्यांकन स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक मिळालेला आहे सन 2016 मध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेद्वारे संस्थेत सहकार गौरव मानपत्राने गौरवण्यात आले आहे. पर्यावरण समतोल राखण्यासाठी संस्थेमार्फत दरवर्षी. दरवर्षी संस्थेच्या सभासदांच्या मुलांचा गुणगौरव केला जातो तसेच ग्रामीण भागातील होतकरू मुलांना मोफत वह्या वाटप व शैक्षणिक वाटप केले जाते. संस्थापक आनंदराव माईंगडे यांनी ग्राााा भागातील मुलांना चांगल्या दर्जाचे गुणवत्तापूर्वक शिक्षण मिळावे यासाठी तुरुकुवाडी सारख्या फोंड्या माळावर सर्व सोयीनिमित्त दत्तसेवा संकुलाचीी उभारण केली आहे.
येथेही विद्यार्थ्यांना उपयुक्त असे अनेक विधायक उपक्रम संस्था सातत्याने राबवित आहे. दत्तसेवा सहकारी पतपेढी मुंबई व दत्त सेवा विद्यालय तुरुकवाडी यांच्या नेत्र दीपक प्रगतीमध्ये संस्थापक आनंदराव मांगडे यांचे व संचालक मंडळ यांचे अविरत परिश्रम घडले आहे. …………..
या मिळालेल्या सहकार रत्न पुरस्काराच्या माध्यमातून त्यांना अजूनही सहकार व सामाजिक कार्यात प्रेरणा मिळेल यात शंका नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!