ताज्या घडामोडी

रिळे येथे महादेव मंदिर सभामंडप उदघाटन.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी / रिळे (ता. शिराळा) येथे आज आमदार मानसिंगराव नाईक यांच्या प्रयत्नाने २५/१५ योजनेतून सुमारे ८.५० लाख रुपये खर्च करून पूर्ण झालेल्या महादेव मंदिरा समोरील सभा मंडपाचे उदघाटन झाले. सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष विराज नाईक यांच्या हस्ते फीत कापून व श्रीफळ फोडून उद्घाटन केले. यावेळी जिल्हाध्यक्ष नाईक यांचा ग्रामस्थांमार्फत सत्कार करण्यात आला. माजी सरपंच एम. एस. पाटील, सरपंच बाजीराव सपकाळ, विश्वास पाटील, कृष्णा पाटील, रघुनाथ बंडकर, के. एम. पाटील, दीपक दोडके, बापू पाटील, प्रवीण पाटील आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!