क्रीडा व मनोरंजन

शिवनेरी सेवा मंडळाची जिल्हास्तरीय रोड रेस २०२२

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी : बाळ तोरसकर

अनुष्का गौड, सुजय शिंत्रे, मुस्कान शेख, समृध्दी चव्हाण, क्षितिज केणी व दुर्वा कोंडुसकर चमकले.

मुंबई, दि. १७ ऑगस्ट (क्री. प्र.):, शिवनेरी सेवा मंडळाने बॉम्बे सिटि डिस्ट्रिक्ट अॅम. अॅथलेटिक्स असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित १४ वर्षाखालील मुले/मुली, १२ वर्षाखालील मुले/मुली, १० वर्षाखालील मुले/मुली यांच्यासाठी मुंबई जिल्हास्तरीय रोड रेस दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी पार पडली. भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शिवनेरी सेवा मंडळातर्फे मुंबई जिल्हास्तरीय धावण्याच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. प्रत्येक गटातील १० यशस्वी स्पर्धकांना गौरवण्यात आले. त्यातील प्रथम तीन खेळाडूंना प्रमाणपत्र, चषक व जागतिक किर्तिचे खेळाडू हे पुस्तक देऊन गौरवण्यात आले.

स्पर्धेतील यशस्वी विजेतांची नावे

१४ वर्षांखालील मुली : १) अनुष्का गौड, २) वैदही जाधव, ३) सिध्दी शिंदे

१४ वर्षांखालील मुले : १) सुजय शिंत्रे, २) राहुल नेवरेकर, ३) सर्वज्ञ बने

१२ वर्षांखालील मुली : १) मुस्कान शेख, २) त्रिशा गुप्ता, ३) आरुषी गुप्ता

१० वर्षांखालील मुली : १) समृध्दी चव्हाण, २) दुर्वांगी गुरव, ३) सोनम शेलार

१० वर्षांखालील मुले : १) क्षितिज केणी, २) नैतिक गुरव, ३) तनिष्क मांजरेकर

०८ वर्षांखालील मुली : १) दुर्वा कोंडुसकर, २) अंतरा चव्हाण, ३) तृष्णा जाधव

स्पर्धेचे उद्घाटन लायन ॲड अरूण देशमुख याच्या हस्ते झाले. स्पर्धेचे बक्षीस वितरण मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती सुयोगी नाईक, लायन ॲड अरूण देशमुख, उपाध्यक्ष श्री देवीदास कदम, कार्याध्यक्ष श्री विष्णु तांडेल, प्रमुख कार्यवाह श्री नितीन पेडणेकर यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी लायन बाळ तोरसकर, लायन अर्चना देशमुख, लायन डॉ. बेलेकर, लायन फिरोज काटरक, श्री महेश सावंत उपस्थित होते. या प्रसंगी ध्वजारोहण श्री जितेंद्र पवार (वरीष्ठ पोलीस निरीक्षक) यांच्या हस्ते पार पडला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!