ताज्या घडामोडी

गोवाडे येथील अभिषेक पाटील यांचा जिल्हा परिषदेमार्फत सत्कार

Spread the love

प्रमोद पाटील
पालघर जिल्हा प्रतिनिधी ता.१७
पालघर तालुक्यातील गोवाडे येथील अभिषेक समीर पाटील याने दि. २५.७.२०२२ ते ३१.७.२०२२ रोजी दिल्ली येथे पार पडलेल्या नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया आयोजित पहिल्या दिग्विजय सिंग मेमोरियल शुटिंग चॅम्पियनशिप शॉटगन या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये ‘ट्रॅप शुटिंग’ या प्रकारात ‘कांस्य पदक’ पटकावल्याबद्दल पालघर जिल्हा परिषदे मार्फत अभिषेक पाटील यांचा नुकताच सत्कार करण्यात आला.

सर्वसाधारण समिती सभेच्या दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष वैदेही वाढाण यांच्या हस्ते आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, उपाध्यक्ष तथा शिक्षण व आरोग्य समीती सभापती ज्ञानेश्वर सांबरे, सर्व समिती सभापती तसेच सर्व जिल्हा परिषद सदस्य यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार करण्यात आला.

अभिषेक हा जिल्हा परिषद सदस्य नीता पाटील यांचा सुपुत्र असून नीता पाटील यांचेही यावेळी सर्व सभागृहामार्फत अभिनंदन करण्यात आले.

यावेळी प्रकल्प संचालक तुषार माळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) संघरत्ना खिल्लारे तसेच सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!