ताज्या घडामोडी

विश्वासराव नाईक साखर कारखाना बॉयलर अग्निप्रदीपन रविवारी.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी : तालुक्यातील चिखली येथील विश्वासराव नाईक सहकारी साखर कारखान्याचा सन 2022-23 या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ रविवारी (ता. 21) होणार आहे. ही माहिती कार्यकारी संचालक अमोल पाटील यांनी दिली.
ते म्हणाले, रविवार ता. 21 ऑगस्ट 2022 रोजी कारखान्याच्या सन 2022-23 या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्री. पी. आर. पाटील (दादा) व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. रत्नकांता पाटील यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता संपन्न होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष, आमदार श्री. मानसिंगराव नाईक (भाऊ), तर प्रमुख उपस्थितीत उपाध्यक्ष, माजी आमदार श्री. बाबासाहेब पाटील (दादा) आहेत. यावेळी सर्व संचालक मंडळ, सभासद, खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी आदी मंडळी उपस्थित असतील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!