आंदोलनमावळसामाजिक

मराठा आरक्षण प्रकरणी तातडीने निर्णय घ्यावा म्हणून आजपासून कार्लागेट ,हाॕटेलसमोर कार्लाफाटा सकल मराठा समाजाचेवतीने ३८ गावातील कार्यकर्ते साखळी उपोषणास प्रारंभ ..

Spread the love

मराठा आरक्षण प्रकरणी तातडीने निर्णय घ्यावा म्हणून आजपासून कार्लागेट ,हाॕटेलसमोर कार्लाफाटा सकल मराठा समाजाचेवतीने ३८ गावातील कार्यकर्ते साखळी उपोषणास प्रारंभ ..

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर लोणावळा प्रतिनिधी, २९ ऑक्टोबर.

मराठा आरक्षण प्रकरणी तातडीने निर्णय घ्यावा , या मागणीसाठी आजपासून कार्लागेट ,हाॕटेलसमोर कार्लाफाटा येथे सकल मराठा समाजाचेवतीने ३८ गावातील कार्यकर्ते साखळी उपोषणास बसले आहेत. दररोज सायंकाळी ६ते ७ आसे प्रवचनांचे कार्यक्रम होणार आहेत.यामधे आज ता.२८ रोजी ह.भ.प.घनश्याम महाराज पडवळ यांचे प्रवचन झाले.

आज कार्ला , केवरे , वळक व डोँगरगाववाडी , टाकवे आदी उपोषणास बसलेले आहेत.सुमारे पन्नास लोक व शालेय विद्यार्थ्यांचा उपोषणाला पाठिंबा आहे.
सकल मराठा समाजातर्फे हा उपोषणाचा निर्णय घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांचे बेमुदत उपोषणास पाठिंबा देण्यासाठी मावळातील कार्ला पंचक्रोशितील व लोणावळ्याचे सर्व प्रभागातील मराठा समाज बांधव एकञ आलेले आहेत.

श्री.घनश्याम महाराज म्हणाले , , आपण संसारात घेतलेला प्रत्येक निर्णय घेतलेला चुकत नसेल , आसे नाही. पण चुकला , तरी तो शेवटपर्यत तडीस नेला. तर तो यशस्वी होतो.
ज्ञानोबाराय म्हणतात, विषयांची आशा पारिजे ! ! या मधे ज्ञानोबाराय म्हणतात, विषयांची आशा धरली जाते..
त्यातून सत्य संकल्पाचा दाता नारायण असे म्हटले आहे.
ज्याने चोच दिली तो दाणा देईलच..! ! आपल्यालाही तो दाणा देईलच..आंतराली सराटी येथे जरांगे पाटील यांनी आरक्षण मिळावे, म्हणून उपोषण करायचे ठरवले, आज चौथा दिवस आहे.पण श्री.जरांगे पाटील यांचे मनात विचार येतील. काही लोक शंका उपस्थित करतील. ते म्हणाले, माझ्या समोर समाज आहे, आमिषाला बळी पडलो, तर ध्येयापर्यत पोहोचणार नाही.

अर्जूनाला भगवंताने आधीच सांगितले, की तू संन्यासाची कपडे घातली आणि सुभद्रा पळवून नेली..म्हणजे स्वधर्म करत असता, तू घाबरला नाहीस,परमार्थ व संसार करताना जगद्गुरू संत तुकोबारायांना ञास झालाय. छञपतींनाही ञास देणारे होते..पण ध्येय निश्चित केल्यामुळे त्यावर छञपती शिवराय ठाम राहिल्याने त्यांना मरेन, पण हटणार नाही, व मरेपर्यत लढणारे मावळे तयार झाले, असे वीर जमले त्यामुळे हिंदवी स्वराज्य निर्माण झाले.
धर्मावर निष्ठा असू द्या ! काही धर्माचे लोक टोपी घालतात.व धर्मासाठी ते व्यवसाय सोडतील, पण तिकडे जातील. आपण धर्मावर निष्ठा ठेवली पाहिजे ! ! तरच आपण यशस्वी होऊ ! !
धर्माबाबत निर्माण झालेली माया यामुळै आपण यशस्वी होऊ ! ! जरी का स्वधर्मू लोपला. तरी सर्व सुखाचा थारा मोडला ! जैसा दिपासवे हारपला प्रकाश जाय ! आसे ज्ञानोबाराय म्हणतात, आपण आपल्या धर्मासाठी आनुष्ठीला तर आपण सुंदर जगू शकतो ! ! असे.पडवळ महाराज म्हणाले.
यावेळी किरण गायकवाड , सुनिल गायकवाड , आनिल हुलावळे , प्रकाश हुलावळे , भाऊसाहेब हुलावळे , गणेश वायकर , जितेंद्र बोञे , भरत भरणे , तुकाराम हुलावळे , संभाजी भानुसघरे , सोमनाथ सावंत , राजूशेठ देवकर ,उमेश तारे , कैलास पडवळ , मंगेशभाऊ कोंडभर आदी उपस्थित होते..
…. ह.भ.प. मंगेशभाऊ कोँडभर यांनी पसायदान म्हटले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!