क्रीडा व मनोरंजनमावळसामाजिक

दर्जेदार पुस्तके वाचां व स्वतः नोट्स काढून,जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवा – मनोहर भोळे सर.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे व गणेश मोफत वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने यूपी एस सी ,एम पी एस सी विद्यार्थ्यांसाठी मनोहर भोळे यांचे मार्गदर्शन.

Spread the love

दर्जेदार पुस्तके वाचां व स्वतः नोट्स काढून,जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवा – मनोहर भोळे सर.Read quality books and take notes yourself, solve maximum question papers – Manohar Bhole sir.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २९ ऑक्टोबर.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे व गणेश मोफत वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने यूपी एस सी ,एम पी एस सी विद्यार्थ्यांसाठी मनोहर भोळे यांचे मार्गदर्शन आयोजित केले होते.तसेच रोटरी क्लब तर्फे गणेश मोफत वाचनालय येथील अभासिकेला ३५ डेस्क chair(खुर्च्या) चां देणगी समारंभ उत्साहात संपन्न झालं.

दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली,या वेळी व्यासपिठावर रोटरीचे अध्यक्ष उद्धव चितळे,सचिव श्रीशैल मेंन्थे,वाचनालयाचे अध्यक्ष यातीन शाह ,खजिनदार विक्रम दाभाडे,माजी अध्यक्ष प्रशांत दिवेकर ,वक्ते मनोहर भोळे उपस्थित होते.प्रकल्प प्रमुख प्रमोद दाभाडे यांनी सूत्र संचालन केले,मनोहर भोळे मार्गदर्शन संपल्यानंतर विद्यार्थ्यानं बरोबर प्रश्न उत्तरांचा सेशन घेतला.अध्यक्षीय भाषणात चितळे यांनी जिथे खरी गरज तिथे रोटरी नक्की उभी राहते,भविष्यात देखील अभ्येसिकेतील मुलांना आवश्यक तिथे सर्वोतपरी मदत करू अशी ग्वाही दिली.

या वेळी विद्यार्थी ,तसेच रोटरी क्लब चे माजी अध्यक्ष विश्वनाथ मराठे,मंगेश गारोळे,विलास शाह,गुरूप्रसाद कुलकर्णी,नितीन फाकटकर ,प्रसाद मुंगी आदी सदस्य उपस्थित होते.भोळे सरांच्या मार्गदर्शन व्याख्याना नंतर खुर्च्या देणगी चा कार्यक्रम संपन झाला,खुर्च्या साठी योगदान दिल्या बद्दल प्रकल्प प्रमुख प्रमोद दाभाडे यांनी अध्यक्ष उद्धव चितळे,उपाध्यक्ष कमलेश कार्ले,सचिव श्रीशैल मेंन्थे,पी डी जी दिपक गंगोळी,शर्मिला शाह,डॉ नेहा कुलकर्णी,डॉ ज्योती मुंदर्गी,कीर्ती मोहरीर,संजय अडसूळ,डॉ गुरूप्रसाद कुलकर्णी,वेदांग महाजन,शैलेश जोशी,विकास उभे यांचे विशेष आभार मानले.

सूत्र संचालन प्रकल्प प्रमुख प्रमोद दाभाडे यांनी केले,आभार वाचनालयाचे खजिनदार विक्रम दाभाडे यांनी मानले,कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!