ताज्या घडामोडी

बिळाशी येथे दैनिक पुण्यनगरीचे व ईगल न्युजचे पत्रकार प्रतापराव शिंदे यांचा सत्कार

Spread the love

कोकरुड/वार्ताहर
कोकरुड ता.शिराळा येथिल दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार व ईगल न्युज प्रतिनिधी प्रतापराव शिंदे यांना पत्रकार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी बद्दल ठाणे येथे नुकताच अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचा राज्यस्तरीय ‘पत्रकार भुषण’ पुरस्कार मिळाल्याबद्दल केंद्रीय विधी व न्याय राज्यमंत्री सत्यपालसिंग बघेल यांच्या हस्ते शाल पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला. केंद्रीय मंत्री सत्यपालसिंग बघेल हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या बिळाशी गावातील क्रांन्तीकारकांना अभिवादन करण्यासाठी महादेव मंदिर परिसरात आले होते. प्रारंभी क्रांतिवीरांगणा श्रीमती हिराबाई गोविंद पाटील यांचाही सत्कार मंत्री बघेल यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी व्यासपीठावर खासदार संजयकाका पाटील, भाजपचे सांगली जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार भगवानराव साळुंखे, आमदार गोपिचंद पडळकर, इस्लामपुरचे नगराध्यक्ष निशीकांत पाटील, भाजपचे युवानेते सत्यजित देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास जि.प.सदस्य संपतराव देशमुख, भाजपचे तालुकाध्यक्ष हणमंततराव पाटील, माजी उपसभापती आनंदराव पाटील, डॉ.एन.के.पाटील, बाजीराव पाटील, शामराव पाटील, सरपंच कल्पना यमगर, उपसरपंच सुवर्णा साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय मगदूम विनायक पाटील, सुजाता देशमाने, सुवर्णा पाटील,बाबासाहेब परिट, तानाजी पवार, बाबासाहेब कदम, दिलीप कुंभार,विलास रोकडे, शंकर पाटील, सुरेश पाटील, विजय साळुंखे, आनंदा पाटील, संतोष पाटील,अभिजित देशमाने, भगवान पाटील, सुर्यकांत शिंदे, वैभव सातपुते, सुहास पाटील,संग्राम लोहार, प्रकाश पाटील आदींसह बिळाशी गावातील प्रमुख पदाधिकारी ग्रामस्थ महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन आनंदा पाटील यांनी केले

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!