आरोग्य व शिक्षण

खुनातील फरार आरोपीला अटक

लोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई

Spread the love

कामशेत : शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून करून फरार असणाऱ्या आरोपीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी मोठ्या शिताफीने सापळा रचून अटक केली.

विठ्ठल केशवराव मोरे (वय ३५ वर्षे, रा. पानशेवाडी ता. कंधार जि. नांदेड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भा. द. वि. कलम ३०२ ह्या गुन्ह्यातील आरोपी विठ्ठल मोरे हा लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पवनानगर येथील एका हॉटेल मध्ये येणार असल्याची माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून त्याला शिताफीने अटक केली.

लोणावळा विभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक नवनीत कुमार कांवत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी. वाय. मुजावर, शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नाजीम पठाण, लोणावळा ग्रामीणचे पोलीस नाईक जितेंद्र दीक्षित, संतोष शेळके यांनी ही कारवाई केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!