ताज्या घडामोडी

कर्मवीर ए.टी. पवार(दादासाहेब) माध्यमिक विद्यालय नामांतरण व फलक अनावरण सोहळा संपन्न

Spread the love

महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री कळवणचे भूमिपुत्र व समाज सुधार समिती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय कर्मवीर तथा लोकनेते ए.टी पवार साहेब तथा दादासाहेब यांनी शिक्षणाची गंगा आदिवासींच्या दारापर्यंत पोचवून त्यांना सुसंस्कृत आणि एक आदर्श व्यक्तिमत्व घडविण्याचा व विद्यार्थिनींचे सबलीकरण करण्यासाठी ज्ञानाची गंगा सर्वांसाठी खुली व्हावी व शहरी भागात आदिवासी विद्यार्थी विद्यार्थिनींना शिक्षण सहज उपलब्ध व्हावे म्हणून त्यांनी म्हसरुळ, दिंडोरी रोड, नासिक येथे समाज सुधार समिती संचलित, संस्थेची नूतन विनय माध्यमिक विद्यालय या विद्यालयाची सुरुवात 1983- 84 मध्ये नूतन विनय माध्यमिक विद्यालय या नावाने म्हसरूळ दिंडोरी रोड नाशिक माध्यमिक शाळा सुरू केली दिनांक 8/9/2022 वार गुरुवार रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या शाळेचे नामांतरण व फलक अनावरण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला शाळेचे नूतन विनय माध्यमिक विद्यालय या विद्यालयाच्या नावात बदल करून शाळेचे नाव कर्मवीर ए. टी पवार माध्यमिक विद्यालय म्हसरुळ असे नामांतरण व फलक अनावरण सोहळा कार्यक्रम प्रसंगी संस्था सचिव माननीय शकुंतला ताई पवार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या संचालिका श्रीमती गीतांजली ताई पवार जिल्हा परिषद सदस्य व माननीय आनंदजी गोळे शालेय समिती अध्यक्ष तसेच ॲड एकनाथ पगार सामाजिक कार्यकर्ते शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री पी.एस. पाटील आश्रम शाळेची माजी मुख्याध्यापक श्री एस एच गवांदे कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते मान्यवरांचा सत्कार व स्वागत शाळेचे मुख्याध्यापक श्री के.के. काळे सर यांनी केले शाळेचे माजी मुख्याध्यापक श्री पी.एस. पाटील यांनी दादा साहेबांच्या कार्याबद्दल माहिती सांगितली ॲड एकनाथ पगार यांनी दादासाहेबांना असणारी समाजाबद्दलची तळमळ व त्यांचे कळवण क्षेत्रातील सामाजिक कार्य व त्यांना शिक्षणाबद्दल असणारी ओढ याबद्दल अधिक माहिती सांगितली कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय शकुंतलाताई पवार यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणात जिद्द चिकाटी मेहनत अंगी बाळगली तर यश हे निश्चित असते तुम्ही प्रयत्न करा नियमित अभ्यास करा हसा खेळा पण शिस्त पाळा असे मोजके शब्दात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले याप्रसंगी प्राथमिक आश्रम शाळा व माध्यमिक आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री घरटे सर व श्री गवळी सर तसेच इतर शिक्षक वर्ग उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती एस.पी. जाधव तर अनुमोदन श्रीमती चौधरी व आभार एन एस जाधव यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी शालेय कर्मचारी श्रीमती शिंदे श्रीमती सोनवणे श्रीमती थेटे श्रीमती आवारे श्रीमती पाटील श्री गवळी श्री अंधारे श्री मानकर श्री पवार आदींनी विशेष परिश्रम घेतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!