ताज्या घडामोडी

श्री.गणेश आखाड्याचे मार्गदर्शक कुस्ती कोच वसंतराव यशवंत पाटील यांना ‘क्रांतीवीर शामराव (बापू) लाड कुस्तीभूषण पुरस्कार २०२२’ जाहीर.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी /
कुंडल ता.पलूस येथील महाराष्ट्र कुस्ती मैदानात होणाऱ्या जंगी कुस्ती मैदानात अंत्री बुद्रुकचे सुपुत्र व श्री.गणेश आखाडा,भाईंदरचे मार्गदर्शक वसंतराव पाटील यांनी कुस्ती क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना यावर्षीचा देण्यात येणारा ‘क्रांतीवीर शामराव (बापू) लाड कुस्तीभूषण पुरस्कार २०२२’ सन्मानचिन्ह व रोख रक्कम देवून मान्यवरांच्या हस्ते कुस्ती मैदानात देण्यात येणार आहे.
श्री.वसंतराव पाटील यांनी पाच कोटींचा आखाडा बांधून मॅट व माती हॉल तसेच १०० मल्लांना सर्व सोयींनीयुक्त राहण्याची सोय केली आहे. गेली अनेक वर्षे कुस्ती प्रशिक्षक व संस्कार शिबिरे घेवून अनेक नवोदित मल्ल घडविण्याचे काम करीत असून अनेक गोरगरीब होतकरू मल्लांना दत्तक घेऊन मदत करीत आहेत.तसेच त्यांनी मुंबई याठिकाणी महाराष्ट्र केसरी,कामगार केसरी,महापौर केसरी सह अनेक मैदाने घेऊन पार पाडली आहेत. त्यांना अनेक मानसन्मान व पुरस्कार मिळाले आहेत. या पुरस्काराबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!