ताज्या घडामोडी

मधु चव्हाण अमृत महोत्सवी चषक कॅरम स्पर्धेत मराठा हायस्कूल, डिसोझा हायस्कूल उपांत्य फेरीत

Spread the love

क्रीडा प्रतिनिधी: बाळ तोरसकर

मुंबई, भाजप नेते श्री. मधु चव्हाण अमृत महोत्सवी चषक आंतर शालेय विनाशुल्क कॅरम स्पर्धेमध्ये मराठा हायस्कूल (वरळी), अँटोनियो डिसोझा हायस्कूल (भायखळा) संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश केला. सिमरन शिंदे, तनिष लादे, रिषभ मालवणकर यांच्या विजयामुळे मराठा हायस्कूलने दादरच्या ताराबाई मोडक हायस्कूलचा ३-० असा तर यश निवलकर व विराज चुडासामा यांच्या अचूक खेळामुळे डिसोझा हायस्कूलने कुर्ल्याच्या सीईएस मायकल हायस्कूलचा २-१ असा पराभव केला. माजी आमदार मधु चव्हाण, आंतरराष्ट्रीय किर्तीचे कॅरमपटू जितेंद्र काळे, राष्ट्रीय कॅरमपटू प्रमोद शेवाळे, राष्ट्रीय कॅरमपटू वैभवी शेवाळे, ज्येष्ठ पत्रकार सुहास जोशी व शिवछत्रपती पुरस्कार विजेते लीलाधर चव्हाण यांनी शालेय खेळाडूंना तिसऱ्या सत्रात मार्गदर्शन केले.

नागरिक विकास परिषद, बीजेपी-भायखळा व आयडियल स्पोर्ट्स अकॅडमी आयोजित शालेय कॅरम स्पर्धेचा डिसोझा हायस्कूल विरुध्द मायकल हायस्कूल यामधील उपांत्यपूर्व फेरीचा सामना चुरशीचा झाला. यश निवलकरने शुभम परमारला ११-४ असे नमवून डिसोझा हायस्कूल संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. निखील भोसलेने प्रारंभी पिछाडीवर राहून देखील कार्तिक शिंदेला १५-५ असे हरविले आणि मायकल हायस्कूल संघाला १-१ अशी बरोबरी करून दिली. निर्णायक तिसऱ्या सामन्यामध्ये ५-५ अशा समान गुणसंख्येनंतर विराज चुडासामाने शकलीन अन्सारीचे आव्हान १४-५ असे संपुष्टात आणून डिसोझा हायस्कूलच्या विजयावर २-१ असा शिक्कामोर्तब केला. दुसऱ्या सामन्यात सिमरन शिंदेने १-० अशी आघाडी मिळवून दिल्यानंतर तनिष लादेने रोनित अहिरेचा २५-० असा तर रिषभ मालवणकरने यश राऊतचा २१-८ असा पराभव केला. परिणामी मराठा हायस्कूलने ३-० अशा विजयासह उपांत्य फेरीत धडक दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!