आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

लोणावळा येथे ढोलताशांचा दणदणाट, टाळ मृदूंगाचा गजर , गुलाल व फुलांच्या पाकळ्या यांची उधळण !!

सुमारे आठ तासांच्या मिरवणूकीने गणरायाला निरोप.

Spread the love

 लोणावळा गणेश विसर्जन: ढोलताशांचा दणदणाट, टाळ मृदूंगाचा गजर , गुलाल व फुलांच्या पाकळ्या यांचे उधळणीत सुमारे आठ तासांच्या मिरवणूकीने गणरायाला निरोप.

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा प्रतिनिधी,१० सप्टेंबर.

ढोलताशांचा दणदणाट , टाळ मृदूंगाचा गजर , गुलाल व फुलांच्या पाकळ्या यांचे उधळणीत सुमारे आठ तासांच्या मिरवणूकीने लोणावळ्यातील सुमारे बावीस सार्वजनिक व दोन खाजगी गणरायाला निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया , पुढच्या वर्षी लवकर या ! अशा जयघोषात शांततेत श्री गणपतीचे मुर्तीचे कृतीम हौद व टाटा तलावात विसर्जन करण्यात आले.

मानाचा पहिला श्री रायवूड गणेश मंडळाचा गणपती आरतीनंतर मिरवणूकीने लालटाकी , ते काॕंन्व्हेंट हायस्कूल मार्गे शिवाजी उद्यानपर्यत ढोल ताशांच्या गजरात निघाला . या मंडळाचेपुढे श्री सिध्दीविनायक ढोलताशा पथक तसेच मंडळाचे कार्यकर्त्यांचे ढोल ताशा पथक शोभा देत होते.

सायंकाळी सहा वाजता मावळा पुतळा येथे पोलिस अधिकारी श्री.पवार यांचे हस्ते मावळा पुतळ्यास पुष्पहार घालून व श्रीफळ फोडून मिरवणुकीला प्रारंभ झाला. यावेळी श्री रायवूड गणेश मंडळाचे ट्रस्टचे अध्यक्ष राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विलासभाऊ बडेकर , अध्यक्ष धिरज मोहोळ , तसेच माजी उपनगराध्यक्ष भरतशेठ हारपुडे , तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

मानाचा दुसरा गणपती श्री तरूण मराठा मंडळ याचेपुढे श्री नामदेव महाराज आगे यांचे नेतृत्वाखाली बालवारकरी यांची दिंडी शोभा देत होती.याबरोबर गावठाण येथील शारदा हे ढोलताशा पथक होते.

मंडळाचे मानद अध्यक्ष श्रीमंत रमेशचंद्रजी व्यास , आणि उद्योजक प्रकाशआप्पा गवळी , माजी नगराध्यक्ष अमित गवळी , उत्सव अध्यक्ष सुमित गवळी, माजी उपनगराध्यक्षा संध्या खंडेलवाल , उद्योजक सुबोध खंडेलवाल आदीसह मान्यवर उपस्थित होते.. यावेळी संजय तिकोणे , विजय हारपुडे पाटील ,  पांगारे पाटील , गोपाळ हारपुडे ,दामूआण्णा चव्हाण आदी उपस्थीत होते.

या पाठोपाठ मानाचा तिसरा श्री रोहिदास तरूण मंडळाचा गणपती आकर्षक रथावर विराजमान होता. यापुढे बॕँजो चे तालावर तरूण तरूणी नाचत होते. तसेच भैरव गर्जना हे ढोलताशा पथक होते. या मंडळात माजी उपनगराध्यक्षा आरोही तळेगावकर , उद्योजक उमेश तळेगावकर , तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

मानाचा चवथा श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्यावतीने टाळ मृदूंगाचे तालात वारकरी मंडळी तसेच श्रीराम क्रीडा मंडळाचे ढोलताशा पथक होते. यावेळी मंडळाचे अध्यक्ष गणेश शिवाप्पा गवळी , मनोज दत्ताञेय गवळी , तसेच माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिर्के , उद्योजक अतुलशेठ जोशी आदी उपस्थित होते.
पाठोपाठ वलवण येथील श्री शेतकरी भजनी मंडळाचा गणपती आकर्षक रथावर आला.या मंडळात गुलालाची प्रचंड उधळण करण्यात आली होती. या वेळी माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर , कामगारनेते विलास पाळेकर , भरत भरणे , रमेश पाळेकर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. श्रीमंत ढोलताशा पथक यावेळी उपस्थित होते.

आमदार सुनिल शेळके यांनी राष्ट्रवादीचे स्वागत व्यासपीठावर गणपतीचे व ढोलताशा पथकाचे जोरदार स्वागत केले.यावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणात गुलालाची उधळण करण्यात आली. शहराध्यक्ष विलासभाऊ बडेकर , माजी शहराध्यक्ष जीवन गायकवाड , राजूशेठ बोराटी , मंजुश्री वाघ , महिला शहरअध्यक्षा उमा मेहता आदींसह राष्ट्रवादीचे युवक पदाधिकारी विनोद होगले , धनंजय काळोखे , अविनाश ढमढेरे , आदी उपस्थित होते.

मानाचा सहावा गणपती राणाप्रताप नेताजी मिञ मंडळाचा आकर्षक रथावर विराजमान होता. यावेळी मानद अध्यक्ष पोलिस अधिकारी दिलीपशेठ होले , अध्यक्ष समीर धेंडे व पदाधिकारी दिनेश ओसवाल , आशिश बुटाला आदी उपस्थित होते.

मानाचा सातवा गणपती जयमहाराष्ट्र गजानन मिञ मंडळाचा आकर्षक रथावर विराजमान झाला होता.सुमारे वीस फूट उंचीची गणपतीची मुर्ती विद्युत रथावर विराजमान होती. वळकाईवाडी येथील राजहंस ढोलताशा पथक शोभा देत होते.
मानाचा आठवा खाजगी गणपती पी.डी.आडकर यांचा गणपती रथावर आरूढ होता. जुना खंडाळा येथील राजा शिवछञपती ढोलताशा पथक शोभा देत होते.

पाठोपाठ नवव्या क्रमांकाला श्री महात्मा फुले आखिल भाजी व फळ मार्केट सार्वजनिक गणपती मंडळाचा गणपती आकर्षक रथावर होता. यापुढे डी.जे च्या तालावर कार्यकर्ते नाचत होते. मानद अध्यक्ष राजू बोराटी , पदाधिकारी चंद्रकांत गदादे आदी मान्यवर उपस्थित होते.

या पुढे अकरा महाराष्ट्र मातंग समाज मंडळाचा गणपती होता.यापुढे जय हनुमान ढोलताशा पथक , बोरज आणि डी.जे बँजोचे तालावर तरूण नाचत होते. यावेळी पदाधिकारी अशोक बोभाटे व संदिप बोभाटे या कार्यकर्त्यांनी लाठीकाठी सहज व अतिवेगाने फिरवून प्रेक्षकामधे चैतन्य आणले व वाहवा मिळविली.

पाठोपाठ क्रमांक १३ वर टेबललँड येथील श्री. नवयुग महाराष्ट्र गणेशोत्सव मंडळ यांचा गणपती होता..यापुढे शिवगर्जना ढोलताशा पथक शोभा देत होते.
या पाठोपाठ क्रमांक १३ वर पोर्टरचाळ येथील श्री साईआझाद गणेशोत्सव मंडळाचा गणपती आकर्षक रथावर विराजमान होता..याबरोबर पदाधिकारी सुनिल पटेकर , तसेच कामगारनेते बाळासाहेब सकट , तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी शावगर्जना , हे केवरे वसाहत , प्रेमनगरचे ढोलताशा पथक शोभा देत होते.

पाठोपाठ कैलासनगर येथील श्री शिवाजी उदय मंडळाचा गणपती आकर्षक रथावर विराजमान झालेला आला. डी.जे.व आॕर्केस्ट्रा चे तालावर तरूणांनी व तरूणीँनी नृत्याचा ठेका धरला होता.
पाठोपाठ श्री.तुफान मिञ मंडळाचा गणपती आकर्षक रथावर विराजमान झाला होता..यापुढे पवना विकास मंडळ , यांचा ढोलताशा पथकाचा खेळ शोभा देत होता.

पाठोपाठ रांगेत १७ क्रमांकाला श्री शिवाजी मिञ मंडळाचा गणपती आकर्षक प्रभु श्रीरामचंद्र आणि अयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्रतिकृती गणपतीचे पुढे रथावर होती. येथे तिरंगा हे आकर्षक ढोलताशा पथक यांचा दणदणाटात सुरू होता. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशशेठ चौव्हाण , संरक्षक चेतन चौव्हाण , निमंञक दिलीपशेठ पवार , उत्सव अध्यक्ष राजेंद्र टाटीया तसेच मान्यवर उपस्थित होते.आकर्षक रथावर गणपती विराजमान होता..मावळचा राजा म्हणून हा गणपतीबाप्पा प्रसिध्द आहे.

क्रमांक १९ वर श्री ओंकार तरूण मंडळाचा गणपती आकर्षक विद्युत रोषणाई केलेल्या रथावर विराजमान झालेला होता. यापुढे हिंदुत्व हे गावातील तरूण , बालके व तरूणी यांचे आकर्षक ढोलताशा पथक शोभा देत होते.. मंडळाचे अध्यक्ष बाप्पूलाल तारे , पदाधिकारी माजी शिक्षण मंडळ सभापती ज्ञानेश्वर येवले , पदाधिकारी निलेश गायकवाड , तसेच माजी नगरसेवक राजूशेठ बच्चे ,आणि लहानथोर खेळाडू तसेच तरूणी , महिला आकर्षक पोशाख परिधान करून आलेले होते..

या पाठोपाठ वीस क्रमांकाला श्री आष्ठविनायक मिञ मंडळ , प्रियदर्शिनी संकूल समोरचा गणपती होता.या गणपतीचे समोर ढोलताशा पथक शोभा देत होते.
या गणपतीचे मंडळाचे पदाधिकारी उद्योजक राजूशेठ सोनवणे , तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.. मंडळाने गुलाल विरहीत मिरवणूक सहभाग घेतला. या पाठोपाठ श्री इंद्रायणीनगर गणेशोत्सव मंडळाचा गणपती आकर्षक रथावर विराजमान होता..डि.जे च्या तालावर मिरवणूक शांततेत संपन्न झाली.

 श्री तानाजी युवक मिञ मंडळाचेवतीने मावळापुतळा , चौक आणि श्रीमंत नेहरू मिञ मंडळांच्यावतीने मिरवणूक मधे सहभागी न होता , वेगळी दुपारी मिरवणूक काढून गणरायाचे विसर्जन करण्यात आले.त्यामुळे ही मंडळे मिरवणूकी मधे सहभागी नव्हती.
साधना काँप्लेक्सचे समोर श्री रामदेवबाबा भक्त मंडळांच्यावतीने राजेंद्र टाटीया यांचे नेतृत्वाखाली सुमारे ३० पोती मुरमुरा पोती व साडेतीनशे किलो फरसाणची भेळ व पिण्यासाठी पाण्याची भाविक भक्तांना व्यवस्था केली होती.
बडोदा बँकेसमोर श्री सत्यनारायण मंदिर चॕरिटेबल ट्रस्ट व मावळ वार्ता फौडेशन , स्पेसलिँक केबल नेटवर्क ,सोशल फोरम आॉन ह्युमन राईटस यांचेतर्फे गणेश भक्तांसाठी , ढोलताशांच्या पथकांना व गणेश मंडळाचे कार्यकर्ते यांना चहा व बिस्कीटे वाटप करून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मावळवार्ता फौडेशन चे अध्यक्ष नंदकुमार वाळंज , मावळवार्ताचे संचालक संजय आडसुळे , प्राचार्य कुमार धायगुडे , श्री सत्यनारायण मंदिर चॕरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष ,माजी नगरसेवक नितीनशेठ आगरवाल , विश्वस्थ आनंद जोशी , तसेचृ माजी नगराध्यक्ष संजय सोनवणे आदी यावेळी उपस्थित होते.
लोणावळा नगरपरिषद इमारतीचे समोर लोणावळा नगरपरिषद व लोणावळा शहर पोलिस स्टेशन यांचे व्यासपीठावर लोणावळा शहरचे पोलिस निरिक्षक सीताराम डुबल , नगरपरिषद प्रशासकीय आधिकारी पंडीत पाटील , तसेच माजी नगरसेवक व पञकार विशाल पाडाळे आणि पञकार आदीसह पाणीपुरवठा कर अधिकारी सतिश गावडे , माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी आणि मान्यवर उपस्थित राहून मंडळांचे स्वागत करीत होते.
भाजप शहर व महिला मोर्चाचे व्यासपीठावर माजी नगराध्यक्षा सुरेखाताई जाधव ,माजी नगरसेवक देविदास कडू , तसेच माजी नगरसेविका मंदा सोनवणे , भाजप महिला शहराध्यक्षा योगिता कोकरे आदी उपस्थित होते.
जवळच काॕँग्रेस आय च्या व्यासपीठावर माजी नगराध्यक्षा उषाताई चौधरी , माजी नगरसेविका सिंधूताई कविश्वर आणि पक्षाचे पदाधिकारी गणपतीचे मंडळाचे व ढोलताशा पथकाचे स्वागत करीत होते..
जवळच महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे पदाधिकारी शहराध्यक्ष भारत चिकणे , पदाधिकारी श्री.भोसले , अक्षय जाचक , तसेच मंगेश खराडे , आदी उपस्थित राहून मंडळांचे स्मृतिचिन्ह देवून स्वागत करीत होते. जवळच श्री सत्यानंद तीर्थधाममधील महाराज व पदाधिकारी बाप्पू पाटील अन्नप्रसादाचे वाटप करत होते.

जयचंद चौकाजवळच लायन्स क्लब आॕफ लोणावळा तर्फे हजारो भाविक भक्तांना चहाचे वाटप करत होते. यावेळी लायन्स क्लबचे वतीने मंडळांचे आणि ढोलताशा पथकांचे स्वागत करण्यात येत होते.जयचंद चौकात श्री दत्तमंदिराचे समोर शिवसेना लोणावळा शहर आणि युवासेना यांचेतर्फे हजारो किलोच्या तांदळाचे पुलाव व पाण्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी शहरप्रमुख बाळासाहेब फाटक , युवासेना तालुका संघटक अनिकेतभाऊ घुले , पदाधिकारी विजयभाऊ तिकोणे ,शिवसेना तालुकामहिला संघटिका संगीताताई कंधारे, माजी महिला पदाधिकारी चंद्राक्का पवार , पदाधिकारी जयवंत दळवी , भगवान देशमुख , माजी नगरसेवक माणिक मराठे , रतन मराठे , माजी सरपंच संजय भोईर , शिवसेना उपतालुकाप्रमुख गबळूभाऊ ठोंबरे , कंधारे , पिंटू शिंदे , आदी उपस्थित होते. या व्यासपीठावरून प्रत्येक गणपती मंडळांचे व ढोलताशा पथकांचे स्मृतिचिन्ह देवून स्वागत केले. सुमारे वीस वर्षे हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे पदाधिकारी म्हणाले.
इंद्रायणीनगर गणेशोत्सव मंडळांच्या गणपतीचे पहाटे सव्वा दोन वाजता आरतीनंतर विसर्जन झाल्यावर मिरवणूक संपली.

सुमारे पंचवीस गृहरक्षकदलाचे जवान तसेच एसआरपी एफ ची एक प्लॕटून , तसेच शंभर पोलिस यांनी पोलिस आधिक्षक डाॕ.आभिनव देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली व पोलिस उपअधिक्षक तसेच पोलिस निरिक्षक सिताराम डुबल यांचे नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवल्याने मिरवणूक शांततेत पार पडली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!