ताज्या घडामोडी

सांगली आरटीओ कार्यालयात आवक जावक नुसार पेपर सादर करून घ्यावेत= बजरंग भोसले व शरीफ पठाण

Spread the love

सांगली आरटीओ कार्यालयात सहाय्यक परिवहन अधिकारी विभागाकडे दररोज नियमित होणाऱ्या कामाचे पेपर सरसकट खाजगी व्यक्तीमार्फत सादर करून आर्थिक लुबाडणूक होत आहे. ती थांबवावी व शासन निर्णयानुसार आवक जावक करून पेपर सादर करून घ्यावे. अन्यथा आंदोलन केली जाईल असे रयत क्रांती वाहतूक संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष बजरंग भोसले व सांगली जिल्हा मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनचे अध्यक्ष शरीफ पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थित नागरिक व मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटना सांगली जिल्हा यांच्यावतीने उप प्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली येथे सहाय्यक परिवहन अधिकारी प्रशांत साळी साहेब यांना निवेदन देण्यात आले. समवेत मोटर व निरीक्षक अधिकारी रवींद्र सोळंके विशाल घनवट साहेब उपस्थित होते.
आरटीओ कार्यालयात व आर.टि.ओ कॅम्प शिबिरात नागरिकांच्या नियमित होणाऱ्या कामाबाबत अधिकारी कर्मचारी कायम सहकार्य करीत आहेत. सहाय्यक परिवहन अधिकारी कार्यालय विभागात नियमित दररोज होणाऱ्या कामाचे पेपर आवक जावक न होता खाजगी व्यक्तीमार्फत सादर होत आहेत. पेपर आवक जावक नसल्याने त्रुटी दाखवून पेंडिंग ठेवले जात आहेत. पेंडिंग असले बाबत विचारणा केल्यास अधिकारी व खाजगी व्यक्तीकडून उडवाउडवीचे उत्तर देऊन अपमानित केले जात आहे. पेंडिंग असलेल्या कामाबाबत खाजगी व्यक्तीकडे ज्यादा आर्थिक रक्कम दिल्यास व्हीआयपी म्हणून त्याचवेळी त्याच दिवशी पेंडिंग असलेले कामे पूर्ण होत आहेत. त्यामुळे नागरिकांच्या खिशाला आर्थिक ज्यादा रकमेच्या बुरदंड बसत आहे
खाजगी व्यक्तीच्या आर्थिक लुबाडणूकीपासुन थांबवण्यासाठी शासन निर्णयानुसार विविध विभागात काम करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्याच्या रजिस्टर मधून नियमित होणाऱ्या कामाचे पेपर आवक जावक होऊन संबंधित विभागास सादर व्हावे. खाजगी व्यक्तीस कार्यालयात काम करण्यास प्राधान्य देऊ नये तेथे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा निर्णय घ्यावा. नियमित होणाऱ्या कामकाजाचे पेपर दिरंगाई करू नये. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना उद्धट बोलू नये. त्यांना सन्मानाची वागणूक मिळावी.
आर आर सी, न्यू रजिस्ट्रेशन, पक्के हेवी लायसन्स व विविध प्रकारची होणारे कामे आरटीओ कॅम्प शिबिरात फायनल अप्रवल व्हावीत. यामुळे सांगली येथील कार्यालयात येणे जाणे वेळ पैसा वाचेल. यावरील परिस्थितीचा त्वरित निर्णय झाल्यास कार्यालयावर व आपणावर नागरिकांचा विश्वास निर्माण होईल.
असे सहाय्यक परिवहन अधिकारी यांना निवेदन देतेवेळी सांगण्यात आले. कामकाजात सुधारणा करू असे आश्वासन देण्यात आले. निवेदनाचा विचार करून लवकरात लवकर कामात सुधारणा करावी अन्यथा नागरिक, वाहतूकदार संघटना, ड्रायविंग स्कूल संचालक जिल्हाधिकारी कार्यालय सांगली व उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली या कार्यालया समोर कामाच्या कार्यपद्धतीबाबत निदर्शने करून आंदोलन केले जाईल पुढील होणाऱ्या परिणामास शासन म्हणून आपण जबाबदार असाल याची नोंद घ्यावी.
यावेळी रयत क्रांती संघटनेचे अल्पसंख्यांक सांगली जिल्हा अध्यक्ष मोहसीन पटवेकर सांगली जिल्हा मोटार ड्रायव्हिंग असोसिएशनचे ज्येष्ठ संचालक जैनुद्दीन सुभेदार, इलाई मकानदार, जफर दिवान, संग्राम भोसले (दादा), फिरोज मोमीन, जुबेर दिवाण,आवेज इबुशे, सैफ दिवान, अशोक शिंदे, जयसिंग शिंदे, ओमकार जगताप, अनिकेत पवार, विश्वजीत भोसले, सूर्यकांत माळी, अक्षय जाधव, अनिकेत माळी, ओंकार जाधव, निरज सूर्यगध, किरण शेलार, प्रतिक एरंडोले, हिम्मत जमादार, संजय शिंदे, अजय इंगळे, यास कार्यकर्ते नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!