आरोग्य व शिक्षणकृषीवार्ता

श्री राजा धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान तळेगाव दाभाडे आयोजित सार्वजनिक गणेश उत्सव बक्षीस वितरण समारंभ 2022 मोठ्या उत्साहात संपन्न.

कार्यक्रमात स्थिर देखावा, सजीव देखावा व हलता देखावा तसेच आदर्श गणेशोत्सव मंडळ इत्यादी पारितोषिके देण्यात आली.

Spread the love

श्री राजा धर्मवीर संभाजी प्रतिष्ठान तळेगाव दाभाडे आयोजित सार्वजनिक गणेश उत्सव बक्षीस वितरण समारंभ 2022 मोठ्या उत्साहात संपन्न.

आवाज न्यूज:  तळेगाव दाभाडे १८ सप्टेंबर. 

स्थिर देखाव्याचे परिक्षण, कार्यकर्त्यांची मेहनत पाहून केले गेले हलत्या देखाव्यांचे परीक्षण मुर्ती संख्या व आवाजावरील हालचाली पाहून केले गेले. सजीव (जिवंत) देखावे यांचे परीक्षण देहबोली वर केले गेले.
कार्यक्रमात स्थिर देखावा, सजीव देखावा व हलता देखावा तसेच आदर्श गणेशोत्सव मंडळ इत्यादी पारितोषिके देण्यात आली. सदर कार्यक्रम लायन दीपक शहा सभागृह लायन्स क्लब तळेगांव दाभाडे या ठिकाणी संपन्न झाला.

आदर्श गणेशोत्सव मंडळ 2022 पुरस्कार जय बजरंग तरुण मंडळ ट्रस्ट राजेंद्र चौक या मंडळाला देण्यात आला

स्थिर देखावा
प्रथम क्रमांक- अखिल विवेकानंद मित्र मंडळ ( केदारनाथ मंदिर प्रतिकृती) द्वितीय क्रमांक विशाल मित्र मंडळ(घोरवाडेश्वर महादेव मंदिर) हलता देखावा :-
प्रथम क्रमांक -फ्रेंड्स क्लब मित्र मंडळ (शिवरायांची न्यायनीती) द्वितीय क्रमांक -श्रीमंत मुरलीधर मंडळ (मार्कंडे याची शिवभक्ती) तृतीय क्रमांक- जय बजरंग तरुण मंडळ जिजामाता चौक (रक्तबीज राक्षसाचा वध )
सजीव देखावा
प्रथम क्रमांक- शिवप्रेमी मित्र मंडळ (उरी सर्जिकल स्ट्राइक) द्वितीय क्रमांक विभागून सरसेनापती उमाबाई दाभाडे गणेश तरुण मंडळ (शेर शिवराज) तसेच हिंदूराज तरुण मंडळ(बलसागर भारत होवो) तृतीय क्रमांक विभागून
शिवक्रांती मित्र मंडळ (श्री तिरुपती बालाजी जन्मकथा) व तरुण ऐक्य मित्र मंडळ (अत्याचाराला कठोर शासन) या कार्यक्रमासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री किरण पठारे तसेच युवा उद्योजक  संकेत खळदे प्रमुख वक्ते प्रशांत दिवेकर

श्री राजा धर्मवीर संभाजी प्रतिष्ठानचे संस्थापक खंडूजी टकले विद्यमान अध्यक्ष अमर खळदे संचालक संजय शिंदे धर्मवीर संभाजी नागरी पतसंस्थेचे विद्यमान अध्यक्ष विजय शेटे संचालक संजय शिंदे प्रतिष्ठानचे संचालक  सतीश गरुड , सदाशिव भोसले, संग्राम शिंदे आदित्य टकले, सागर लगड,  संदीप गडसिंग प्रथमेश शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.

या मंडळाच्या देखाव्यांना पारितोषिके देण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रतिष्ठानच्या सर्व कार्यकर्त्यांनी नियोजन केले.

प्रास्ताविक  संजय शिंदे यांनी केले तसेच प्रमुख पाहुणे , पठारे साहेब यांनी गणेशोत्सवातील कार्यकर्त्यांची भूमिका, या विषयावर आपले मत व्यक्त केले प्रमुख वक्ते प्रशांत दिवेकर यांनी सार्वजनिक गणेशोत्सव यातील बदललेले स्वरूप व कार्यकर्त्यांची मानसिकता यावर बहुमूल्य मार्गदर्शन केले .प्रतिष्ठानचे अध्यक्ष  अमर खळदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले,विविध गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन  मयूर पिंगळे यांनी केले आभार प्रदर्शन सिद्धनाथ नलावडे यांनी केले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!