ताज्या घडामोडी

मॅग्नेट प्रकल्पांतर्गत प्रस्ताव सादर करण्यास दि. 14 ऑक्टोबर पर्यंत मुदत वाढ

Spread the love

एशियन डेव्हलपमेंट बँक व महाराष्ट्र शासन सहकार व पणन विभागांतर्गत मागील वर्षीपासुन मॅग्नेट प्रकल्प कार्यान्वीत करणेत आलेला आहे. मॅग्नेट प्रकल्पाचा मुख्य उद्देश पिकांचे काढणीत्तर होणारे नुकसान कमी करणे, साठवणुक क्षमता वाढवणे त्याचबरोबर पायाभुत सुविधा अंतर्गत मुल्य साखळी विकसीत करणे व मागणीनुसार शेतमालाचे मुल्यवर्धन करणे हा होय.

मॅग्नेट प्रकल्पाच्या दुस-या टप्यामध्ये प्रस्ताव मागवणेबाबत दि. 9 सप्टेंबर 2022 रोजी जाहिरात देणेत आली होती, त्यानुसार 10 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतमाल उत्पादक संस्था, प्रक्रियादार, निर्यातदार, ॲग्रीगेटर व माविम अंतर्गत नोंदणीकृत संस्था यांचेकडुन प्रस्ताव मागविण्यात आले होते. तथापि, विहीत मुदतीत ब-याच संस्थाना प्रस्ताव सादर करता न आलेने उपरोक्त इच्छुक संस्थांसाठी शुक्रवार दि. 14 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेची माहिती विभागीय प्रकल्प उपसंचालक डॉ. सुभाष घुले यानी सांगीलते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!