आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

हवेली व मावळचे विस्तारआधिकारी यांचेकडून कार्ला २ मधील अंगणवाडी व्हीसीडीसीला भेट ..

अहवाल पाहून शेरेबुकामधे नोंदी केल्या.

Spread the love

हवेली व मावळाचे विस्तारआधिकारी यांचेकडून कार्ला २ मधील अंगणवाडी व्हीसीडीसीला भेट ..

आवाज न्यूज : मच्छिंद्र मांडेकर, लोणावळा ता.१२ प्रतिनिधी.

हवेली व मावळ तालुक्यातील विस्तारआधिकारी यांचेकडून मावळातील कार्ला २ मधील अंगणवाडी व्हीसीडीसीला भेट देऊन येथील कामकाज कसे चालले आहे , विद्यार्थांना काय हवे , नको याची चौकशी केली.तसेच येथील अहवाल पाहून शेरेबुकामधे नोंदी केल्या.

एकात्मिक बालविकास सेवा योजना वडगाव मावळ यांचे अंतर्गत बीट कार्ला २ मधे ग्रामबालविकास केंद्र व्ही.सी.डी.सी.एकूण तीन केंद्रामधे सुरू असून १) ओळकाईवाडी,२)वेताळेनगर ३) वैतागवाडी (, औंढेखुर्द ) या केंद्रांना उरळीकांचन हवेली पंचायत समितीचे विस्तार अधिकारी .मोरे सर , वडगाव मावळचे विस्तारआधिकारी .खैरेसर यांनी भेट देवून, मुलांची वजन उंची घेवून पडताळणी केली.

मुलांना देण्यात येणारा आहार स ८ ते सायंकाळी ८ पर्यत चा आहार संहितेप्रमाणे देण्यात येत असल्याबाबत तपासणी केली. औषधे मुलांना डाॕक्टरांच्या सल्ल्याने सुरू असल्याबाबत खाञी केली.मावळ तालुक्याचे मा.सी.डी.पी.ओ.विशाल कोतागडे साहेब व पर्यवेक्षिका कुंभार मॕडम यांचे मार्गदर्शनाखाली व्ही.सी.डी.सी चांगल्या पध्दतीने सुरू असल्याबाबत मत व्यक्त केले.

मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या .कविता मांडेकर (वैतागवाडी ,औंढेखुर्द ),.सविता धरपाळे (वेताळनगर),  सारिका दळवी , नीता मानकर , वंदना शेडगे , चंदा भोसले , सुरेखा गुंड यांचेही व्हीसीडीसी केंद्रात सहभाग चांगला असल्याचे दिसून आले.औंढेखुर्द येथील वैतागवाडी मिनी अंगणवाडी येथे त्यांचे स्वागत अंगणवाडी सेविका, मांडेकर यांचेतर्फे करण्यात आले. वेताळेनगर येथील अंगणवाडी मधे,धरपाळे यांचेतर्फे स्वागत करण्यात आले.

व्ही.सी.डी.सी.( ग्राम बाल विकास केंद्र ) यामधील सॕम मॕम तालुक्याचे बाहेरील हवेलीचे उरळीकांचनचे अधिका-यां कडून अंगणवाडी केंद्राला भेटी देण्यात आल्या.उरळीकांचन चे विस्तार अधिकारी मोरे , पंचायत समितीचे विस्तार अधिकारी खैरे सर यांचेकडून वळकाईवाडी , वेताळेनगर येथील अंगणवाडी व औढे खुर्द येथील वैतागवाडी येथील मिनी आंगणवाडी ला भेट दिली .

येथील रजिस्टर नोंदी , मुलांची वजने व उंची तपासली.त्यांचा आहार कसा असावा . त्यांची वजने व उंची वाढण्यासाठी काय गरजेचे आहे , हे अंगणवाडी ताईंना सांगितले . काय बदल करावा , याबाबत सूचना दिल्या. तसेच पूर्ण रजिस्टर तपासले. यामुळे लहान मुलांच्या बाबत सरकार जागरूक आसल्याचे दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!