आरोग्य व शिक्षणमहाराष्ट्र

जंम्बो चिकन थाळी संपवा आणि अर्धा तोळा सोन्याची अंगठी जिंका.

खवैय्यांना भाऊबीजेपर्यंत फक्त १२०० रुपयांत ही थाळी उपलब्ध..

Spread the love

जंम्बो चिकन थाळी संपवा आणि अर्धा तोळा सोन्याची अंगठी जिंका.

आवाज न्यूज :  तळेगाव दाभाडे, १२ ऑक्टोबर.

जंम्बो चिकन थाळी संपवा आणि अर्धा तोळा सोन्याची अंगठी जिंका ही भन्नाट ऑफर खवय्यांना खुणावते आहे. लॉकडाऊनच्या काळात ड्रीम लंच बॉक्स नावाने सुरू करण्यात आलेल्या घरपोच डबे खाणावळीचे रूपांतर अल्पावधीत हॉटेलमध्ये झाले. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद आणि जिभेवर रेंगाळणाऱ्या अवीट चवीने खवैय्यांनी हॉटेलला प्रथम पसंती दिल्याने मागणीनुसार हॉटेलचा विस्तार करून डायनिंग हॉल, एसी हॉलसह भारतीय बैठकीची योजना राबविली गेली.

वाढता प्रतिसाद आणि पदार्थांच्या मागण्या पाहता वेगवेगळ्या डिशेस ग्राहकांच्या पसंतीस पडल्याची माहिती उद्योजक निशा संग्राम जगताप व जय संग्राम जगताप यांनी दिली.

आता नव्याने भन्नाट कल्पना घेऊन एक दमदार ‘जंम्बो चिकन थाळी संपवा आणि अर्धातोळा सोन्याची अंगठी जिंका’ ही ऑफर नव्याने सुरू झाल्याने ग्राहकांची पसंती मिळत आहे. हॉटेल ड्रीमलंच बॉक्समध्ये यापूर्वी मासवडी थाळी, आमरस थाळी, फिश थाळी अशा वेगवेगळ्या व्हेज, नॉनव्हेज थाळी महोत्सवाला चांगला प्रतिसाद लाभल्याने २५ मिनिटात एकाने ही थाळी संपवल्यास अर्धा तोळा सोन्याची अंगठी मिळविण्याची नामी संधी खवैय्यांना भाऊबीजेपर्यंत उपलब्ध करून दिली आहे. फक्त १२०० रुपयांत ही थाळी उपलब्ध असून विजेत्यास फोटोसह आकर्षक सन्मानचिन्हही देण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!