आरोग्य व शिक्षण

तळेगावच्या श्री दुर्गामाता महिला नागरी सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध ……..

नवनिर्वाचित संचालक समितीची निवडणूक नियम २०१४ अन्वये मंगळवार दि.१४-०२-२०२३ रोजी.व्ही.जे.तळपे, अध्यासी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली .

Spread the love

तळेगावच्या श्री दुर्गामाता महिला नागरी सहकारी संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध ……..

आवाज न्यूज तळेगाव दाभाडे प्रतिनिधी,१८ फेब्रुवारी.

तळेगावच्या श्री दुर्गामाता महिला नागरी सहकारी संस्थेची २०२२-२३ ते २०२७-२८ या कालावधीसाठी घेण्यात आलेली पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली .सदर निवडणुकीतून निवडून आलेल्या नवनिर्वाचित संचालक समितीची निवडणूक नियम २०१४ अन्वये मंगळवार दि.१४-०२-२०२३ रोजी.व्ही.जे.तळपे, अध्यासी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.

सदर निवडणुकीत पंचवार्षिक कालावधीसाठी अध्यक्ष.शर्मिला पवार, उपाध्यक्षा.रुपाली हेमंत लोमटे, सचिव सुजाता गिरीश खेर व खजिनदार.शुभांगी बाळासाहेब बुरुड यांची निवड करण्यात आली. सदर निवडणुकीसाठी मा.सहाय्यक निबंधक व इतर सर्व अधिकारी वर्ग आणि सचिन भिडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

श्री दुर्गामाता महिला नागरी सहकारी संस्थेची स्थापना ४ फेब्रुवारी १९९४ रोजी झाली असून ही मावळातील पहिली महिला पतसंस्था आहे या संस्थेच्या स्थापनेसाठी कै.केशवराव वाडेकर, कै.बाळासाहेब शेळके, कै.रमेश लोमटे तसेच माजी नगराध्यक्ष.उमाकांत कुलकर्णी यांनी मोलाचे योगदान दिले.

संस्थेला २९ वर्षे पुर्ण झाली असून प्रगती पथावर आहे. संस्थेचे अधिकृत भांडवल १ कोटी रु.असून वसूल भाग भांडवल रु. ७१ लाख आहे. खेळते भाग भांडवल ६ कोटी रु. असून ठेवी ४ कोटी २८ लाख रु.इतक्या आहेत. संस्था आजपर्यंत सतत नफा मिळवत आहे.
या निवडणुकीत वरील पदाधिकाऱ्यां व्यतिरिक्त खालील संचालीकांची निवड करण्यात आली.

नीलम उमाकांत कुलकर्णी, ॲड. विजया दिलीप भांडवलकर, नीलम दिलीप खांडगे, कल्पना सुरेश भोपळे, नीता दीपक साळवे, .शुभांगी विश्वास देशपांडे, जयश्री बाळकृष्ण शिंदे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!