आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लायन्स क्लब तळेगाव व तळेगाव नगरपरिषद शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ संपन्न!

लायन्स क्लब ही आंतरराष्ट्रीय संघटना- समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रात कशी कार्यरत आहे.

Spread the love

लायन्स क्लब तळेगाव व तळेगाव नगरपरिषद शिक्षण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ संपन्न!Lions Club Talegaon and Talegaon Nagarparishad Shikshan Mandal jointly organized the goodwill ceremony of 10th students!

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे वार्ताहर, २४ फेब्रुवारी.

लायन दीपक शहा या अद्ययावत सभागृहात- तळेगाव नगर परिषदेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ अतिशय प्रसन्न पवित्र आणि देखण्या स्वरूपात साजरा करण्यात आला.

भारतीय संस्कृतीच्या परंपराप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि स्वागत गीतानंतर- सहाय्यक मुख्याध्यापिका  योगिता शिंदे मॅडम यांनी सर्वांचं शाल श्रीफळ आणि शब्द सुमनांनी स्वागत करून प्रास्ताविक केले. ज्येष्ठ साहित्यिक लेखक लायन डॉक्टर शालिग्राम भंडारी यांनी- विद्यार्थ्यांनी आपल्या शरीराची- मनाची काळजी घेत असताना- अभ्यासाची पद्धत कशी असावी? एकाग्रता- सातत्य आणि सहकार्य यातून यश कसे संपादन करावे? हे– अतिशय सोप्या सरळ भाषेत विद्यार्थ्यांना समजावून सांगितलं.

 

इनरव्हील क्लब च्या विद्यमान अध्यक्षा  वैशाली दाभाडे यांनी विद्यार्थ्यांना वेळेचे महत्व सांगून अतिशय अर्थपूर्ण शुभेच्छा दिल्या. उपमुख्याधिकारी  सुप्रिया शिंदे- मुख्याध्यापिका  वर्षा थोरात यांनीही सर्व विद्यार्थ्यांच अभिष्टचिंतन केले. लायन्स क्लब ही आंतरराष्ट्रीय संघटना- समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रात कशी कार्यरत आहे. यासंदर्भात विद्यार्थ्यांना माहिती देऊन अध्यक्ष मयूर राजगुरव यांनीही- दहावीच्या विद्यार्थ्यांना आपल्या शुभेच्छा दिल्या.

 

ज्येष्ठ पत्रकार  जगन्नाथ काळे हेही या समारंभात उपस्थित होते. शाळेविषयीच्या आपल्या कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या भावना- दहावीच्या काही विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केल्यात! शिक्षक  सुधीर बसवंत आणि  शितल रासकर यांनी सूत्रसंचालन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!