आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाल्याचा वाल्मिकीही होऊ शकतो !!

अट फक्त एकच आहे हाक ऐकणे अंतर्मनाची.

Spread the love

वाल्याचा वाल्मिकीही होऊ शकतो ! अट फक्त एकच आहे हाक ऐकणे अंतर्मनाची.. Valya can be Valmiki too! The only condition is to listen to the call of the heart.

आवाज न्यूज : तळेगाव दाभाडे, विशेष लेख.

थोडसं आपल्याला समजायला लागलं की आपली समाजातील किंमत किती असावी, आणि ती का असावी हा फार महत्त्वाचा विषय हा आपल्या मनात घोळायला लागतो
मग त्याच प्रतिबिंब आपल्या वागण्यात, बोलण्यात ,किंबहुना आपल्या चेहऱ्यावर दिसायला लागत,त्यामुळे मानापमान, रुसवेफुगवे ,सुख दुःख आणि अशा अनेक गोष्टींचा अविष्कार तो अनुभवत असतो.अर्थात आपल्या किमतीविषयी जर पैशाच्या भाषेत बोलायचं तर त्यावर विचार करताना एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे की परमेश्वर ज्यावेळी आपल्याला या पृथ्वीवर पाठवतो ,त्यावेळी त्याने आपल्याबरोबर एक कोरा चेक दिलेला असतो आणि त्या चेक वर किती रक्कम भरायची आहे हे आपण स्वतः कधीच ठरवू शकत नाही हे मलाही माहिती आहे मग ही रक्कम कोण, केव्हा त्या चेकवर भरणार आहे हाच विचार घेऊन आपण आज पुढे जाणार आहोत.

अर्थात बँकेप्रमाणे परमेश्वराने सुद्धा मागचा आपला अकाउंट मधला बॅलन्स कॅरी फॉरवर्ड केलेला आहे. त्याशिवाय तो हा या आपल्या आयुष्याचा चेक आपल्या हातात कधीच देऊ शकत नाही हे निश्चितच शाश्वत सत्य प्रथम आपल्याला कबूल केलं पाहिजे.अर्थात त्यात बॅलन्स किती आहे हे तुम्हाला आणि मलाही माहित नाही पण माझ्या यां नवीन अकाऊंट मध्ये भरण्यासाठी मला माझ्या कर्माचं निश्चितच साहाय्य लागणार आहे आणि ते कर्म कसं चांगलं वाईट आहे हे सर्व समाज ज्यावेळी ठरवेल तेव्हा ठरवेल पण त्या अगोदर माझं स्वतः अंतर्मन माझा कौटुंबिक आणि मित्र परिवार ठरवून बसलेला असेल तेही माझ्या नकळत त्यामुळे कुठलेही कर्म करताना मी ठरवून माझ्यात असलेल्या गुणांच्या बुद्धिचातुर्याने ज्ञानाने आणि अनुभवाने माझ्या वागण्या-बोलण्यातून सादरीकरणातून वेळोवेळी ते प्रगट केले पाहिजे कारण त्यावरच माझ्या चेक वर किती रक्कम भरायची आहे याची मला सातत्याने जाणीव ठेवावी लागणार आहे.

त्यामुळेच कर्माच्या रस्त्यावरून चालताना मी माझी सद्सद्विवेकबुद्धी जर ठिकाणावर ठेवली तर निश्चितच माझ्या हातून कुठलेही दुष्कृत्य घडणार नाही अर्थात या माझ्या सर्व कर्मा वर नजर ठेवण्यासाठी समाजाला अनेक वर्षांचा काळ लागणार आहे कारण मित्रांनो कुठलंही पिक पेरल्यानंतर त्याची फळ येण्यासाठी निदान चार महिने, सहा महिने ,वर्षभर हा असा काळ लागणारच आहे. जसं गहू, ज्वारी, बाजरी ,ऊस, केळी यांना लागतो तसंच मी जे काही चांगलं वाईट करणार आहे, त्याला उत्तम विचारांच खतपाणी घालणार आहे तरच माझ्या कर्माच पिक तरारून वरती येणार आहे आणि त्या पिकाची किंमत माझाच समाज ठरवणार आहे.

 

उदाहरण द्यावयाच म्हणजे डॉक्टर भंडारी कसे आहेत , जोशी ,कुलकर्णी ,देशपांडे अंधारे नांदेडकर कसे आहेत हे कोणीही मला स्वतःला विचारणार नाही कारण ते समाजच ठरवणार आहे .शेवटी या सर्वांचा परिपाक म्हणजे परमेश्वराने जन्मापासून मला आणि आपल्याला बहाल केलेला जो चेक आहे त्या वर ती रक्कम लिहिली जाणार आहे कदाचित ती राजकारणी लोकांना त्यांच्या मत पेटीतून प्रत्यक्ष अनुभवायला मिळणार आहे , तसेच एखाद्या सामाजिक कार्यकर्त्याला समाज जी संपन्नता, समृद्धी आणि सन्मान वेळोवळी प्रदान करणार आहे त्यामुळे ती किंमत त्यांना आपोआपच कळणार आहे .अर्थात कदाचित आजच्या स्पर्धेच्या आणि साम-दाम-दंड-भेद या मुळे काळानुसार या संकल्पना निश्चितच बदललेल्या ही असतील पण जर मित्रांनो त्याला एकदा का होईना समाजाने दिलेल्या पतं पद आणि प्रतिष्ठेची झूल पांघरायला मिळाली तर त्याचा वाल्याचा वाल्मिकी ही होऊ शकतो हा आपल्या सर्वांचा अनुभव आहेच.

  • तरीपण याबरोबरच लोक काय म्हणतील “सबसे बडा रोग क्या कहेंगे लोग” हा विचार त्याला अस्वस्थ करून सोडणारआहे .एवढेच नव्हे तर त्याला कायद्याची ,देवाची भीती नकळत त्याच्या मनात कुठेतरी दडलेली असते .त्यामुळे त्याची इच्छा असो वा नसो तो चुकलेल्या वाटेवरून निश्चितच योग्य अश्या रस्त्यावर येणारच आहे आणि तो पुन्हा कार्यरत होणार आहेच त्यामुळे निश्चितच त्याच्या जीवन प्रवासातील त्याच्या चेक वर लिहिली जाणारी किंमत वाढणारच आहे आजचा विषय जरी कठीण असला तरी तो अत्यंत विचारपूर्वक जर आपल्या मनाने घेतला तर सुरुवातीला विचारलेल्या आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळालेली आहेत याविषयी मला कुठलीही शंका नाही आणि म्हणून “देर आये, दुरुस्त आये” असे म्हटले तरी चालेल.

आज केवळ भारतच नव्हे तर संपूर्ण जग ज्या संघर्षाच्या आणि संकटाच्या दिशेने चाललेला आहे, त्यावेळी वंचितांना मदत करण्याची ही सुवर्णसंधी आपल्याला प्राप्त झालेली आहे असं समजून आजच आपण यथाशक्ती कार्यरत होऊया आणि आपलं सामाजिक योगदान सिद्ध करूया त्यासाठी आपण सिस्टर डॉक्टर पोलीस म्हणून असणे कदापिही आवश्यक नाही तरी एक सच्चा सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपली भूमिका आपण स्वीकारली तर आजचा विषय आपल्या पर्यंत पूर्णपणे पोहोचलेला आहे.  लायन डॉक्टर शाळीग्राम भंडारी.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!