ताज्या घडामोडी

लोककलावंतांसाठी मोफत समतोल कलामंच व त्यांच्या मुलांसाठी निवासी शाळा मोफत सुरू करणार सुरू होणार

Spread the love

नारायणगाव प्रतिनिधी

हलगी सम्राट केरबा पाटील संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी मुरबाड तालुक्यातील मामनोली येथील समतोल फाउंडेशन संस्थेला नुकतीच भेट दिली.

समतोल फाउंडेशन ही संस्था संपूर्ण राज्यात सेवाभावी काम करणारे संस्था आहे. या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विजय जाधव यांनी संस्थेच्या कार्याची माहिती देताना म्हणाले, या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत 40,000 हजार हरवलेल्या, निराधार सापडलेल्या रेल्वे स्टेशनवर सापडलेल्या मुलांना आसरा देऊन पुन्हा त्यांचं हस्तांतर करणारी ही अग्रगण्य संस्था आहे. संस्थेच्या माध्यमातून अन्नछत्र दररोज 500 निराधारांना जेवण दिले जाते .,सेंद्रिय पद्धतीची शेती करणे, गोपालन ,कुकुटपालन यासारखे अनेक सेवाभावी उपक्रम गेली 17 वर्ष ही संस्था कार्य करीत आहे. शाळाबाह्य मुलांसाठी “शिक्षण आपल्या दारी” हा उपक्रम तसेच बालकामगारांची सुटका करणे., त्यांचे मनी परिवर्तनाची शिबिर घेणे, बेघर, बेवारस, हरवलेली मुले, निराधार मुलांचे पुनर्वसन करून समाजाच्या प्रहार त्यांना आणणे .हे अतिशय महत्त्वाचे काम ही संस्था करते आहे .

या संस्थेच्या माध्यमातून तमाशा पंढरी नारायणगावच्या परिसरात खास लोक कलावंतांसाठी मोफत वृद्धाश्रम व लोक कलावंतांच्या मुलांसाठी मोफत निवासी शाळा सुरू करण्याचे नियोजन केलेले आहे. हा भव्य दिव्य प्रकल्प लवकरच अमलात आणून .त्या ठिकाणी विविध कलेचे प्रशिक्षण मुलांना दिले जाणारा आहे.जुन्नर तालुका पर्यटन होत आहे. त्यामुळे या कलावंतांच्या विकासासाठी उभारण्यात येणारा प्रकल्प हा जुन्नर तालुक्याच्या वैभवात अधिकची भर घालणारा ठरेल .

समतोल फाउंडेशनला भेट देण्यासाठी हलगी सम्राट केरबा पाटील संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ आल्हाट, सेवानिवृत्त वनाधिकारी वसंतराव लोंढे, सुधाकर राजगुरू,अनिल शिंदे, अमोल आल्हाट, अमित आल्हाट, संस्थेच्या या सर्व मान्यवरांनी भेट दिली.
समतोल फाउंडेशनचे संस्थापक विजय जाधव यांच्या कार्याचे कौतुक केले.आपणही प्रकल्प भेटीसाठी जाऊ शकता संस्थेच्या कार्यात सहभागी होऊन एका मुलाचे आयुष्य घडवु शकता.समतोल फांऊंडेशन कल्याण मुरबाड रोड मामणोली हिंदु सेवा संघ कल्याण पश्चिम संपर्क 9892961124 विजय जाधव

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!