ताज्या घडामोडी

डॉ. नितीन जाधव प्रस्तुत स्वरानंद संगीत मंच यांच्या वतीने “दीपसंध्या”संपन्न.

Spread the love

शिराळा प्रतिनिधी
शिराळा शहरांमध्ये प्रथमच दीपावली मध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी दीपसंध्या या संगीत मंचाचे उद्घाटन सौ. सुनीतादेवी मानसिंगराव नाईक, जिल्हा सहकार बोर्डचे माजी अध्यक्ष सुखदेव पाटील, माजी नगराध्यक्षा सौ. सुनंदा सोनटक्के, डॉ. सौ. कृष्णा जाधव यांच्याहस्ते करण्यात आले.
कोटी कोटी रुपे तुझी हे गणेश गीत डॉ. नितीन जाधव यांनी गायले आणि दिपसंध्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. अरे मन मोहना, मी आले मी निघाले या सारखी गाणी सादर करून डॉ. सौ. प्रिया यादव यांनी रसिक श्रोत्यांना ताल धरायला लावला. फुलले रे क्षण, रुपेरी वाळूत माडांच्या बनात येणा या गाण्यांच्या चालीने सौ. राधिका कुलकर्णी यांनी सभगृहाला शास्त्रीय संगीताची चुणूक दाखवून दिली. अधीर मन झाले, बहुत प्यार करते है या गाण्यांनी सौ. सुरेखा पाटील यांनी मंत्रमुग्ध केले. डॉ. नितीन जाधव यांनी गायलेल्या,छुकर मेरे मन को देखा एक ख्वाब ,राजा ललकारी, भन्नाट रानवारा, संधिकाली या , सलामे ईश्क ई हिंदी मराठी गीतानी रसिकाना मंत्रमुग्ध केले.पाहीले न मी तुला या गाण्यान वन्स मोअर मिळवला. कु. प्रतीक्षा शिंदे हीने ऐरणीच्या देवा तसेच सर्वांनी आली माझ्या घरी ही दिवाळी गीत म्हणून कार्यक्रमाची सांगता झाली.
अमोल कांबळे, केदार चव्हाण, उल्हास कांबळे,विक्रम दाभाडे, अमित कांबळे यांनी वाद्यांची साथ दिली तर विनायक गायकवाड आणि डॉ. सौ. कृष्णा जाधव यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन केले. यावेळी प्रमोद नाईक, शिल्पा कुरणे, डॉ. दीपक यादव, प्रताप पाटील, डॉ. एस आर पाटील, डॉ प्रभाकर,डॉ आबासाहेब पाटील, डॉ प्रदीप काकड़े सौ. सुखदा महाजन, कल्पना गायकवाड, पंडित हणमंतराव जाधव, पंडित लोहार, उदय राजमाने आणि कलाविष्कार इस्लामपुर चे सदस्य,निवृत्त मुख्याध्यापक पी. के. कांबळे यांच्यासह मोठ्या संख्येने रसिकवर्ग उपस्थित होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!